Nitesh Karale Sarkarnama
विदर्भ

Nitesh Karale News : भाजपच नाही, तर आजवर एकही सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आले नाही !

सरकारनामा ब्यूरो

Teacher Nitesh Karale on Todays' Politics : सध्याची राजकीय परिस्थिती फार वाईट आहे. इकडचे आमदार केवळ पैशांसाठी तिकडे उठून पळतात आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर निवडून आलेले आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला जातात आणि महाराष्ट्रात येऊन सरकार स्थापन करतात. नैतिकता कुठेतरी संपली, असे वर्धा येथील शिक्षक नितेश कराळे म्हणाले. (MLAs from here run there only for money)

नितेश कराळे म्हणजेच कराळे गुरूजी आज अख्ख्या महाराष्‍ट्राला ठाऊक आहेत, ते त्यांना वऱ्हाडी भाषेतील आगळ्यावेगळ्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे. सध्या कराळे गुरूजी पंढरपूरला त्यांच्या सहकाऱ्यांसोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले आहेत. तेथे एका वृत्तवाहीनीशी बोलताना ते म्हणाले, राजकारणातील नैतिकता पार रसातळाला गेली आहे. औरंगजेबाने त्याच्या पित्यालाही सोडले नाही आणि अशा औरंगजेबावरूनही आज राजकारण केले जाते, हे फार वाईट आहे.

राजकीय पुढारी वैयक्तिक आकसावर उतरले आहेत. रोज कुणीतरी एकमेकांची उणीदुणी काढतो. एखादा मुद्दा निघाला की त्यावरून कित्येक दिवस राजकारण केले जाते. यामध्ये मूळ प्रश्‍न बाजुलाच राहतात.

शेतकऱ्यांचे प्रश्‍न एखाद्या नेत्याने उचलले किंवा सरकारच्या विरोधात भूमिका मांडली की, त्याला ईडीची नोटीस येते. केंद्र सरकार कडून ईडीचा वापर सर्रास राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी केला जात आहे. यापूर्वी राजकारणात अशी स्थिती कधीही नव्हती, असे नितेश कराळे यांनी खास वऱ्हाडी शैलीत सांगितले..

डीची नोटीस आल्यानंतर तो नेता किंवा कोणताही व्यावसायिक भारतीय जनता पक्षात (BJP) गेला की, तो धुतल्या तांदळासारखा होऊन जातो. नोटीस बंद होतात आणि त्याची चौकशीसुद्धा बंद होऊन जाते. भाजप म्हणजे जादूचा पेटारा झाला आहे. हे सर्वसामान्य जनता बघत आहे. वेळ आल्यावर याचा हिशोब जनता नक्कीच घेणार, असे कराळे यांनी सांगितले.

आधी सोयाबीनचे भाव चांगले होते. मग शेतकऱ्यांचा (Farmers) सोयाबीन बाजारात येताच १२ लाख टन सोयाबीनचे डीओसी आयात केली. कापसाचे भाव १२ हजारांवर गेले होते, तर लगेच ऑस्ट्रेलियातून कापसाच्या गाठी बोलावल्या.

तुरीचे भाव आता १२ ते १३ हजारावर आहेत. त्यामुळे सरकार तुरीची डाळसुद्धा आयात करणार, याची केवळ शक्यता नाही तर गॅरंटी आहे. मागच्या वेळी इजिप्तवरून डाळ बोलावली होती. त्यामुळे हे काय आजवरचे कोणतेही सरकार (Government) शेतकऱ्याच्या हिताचे नव्हते, असा हल्लाबोल कराळे गुरुजींनी केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT