Nitesh Karale Sarkarnama
विदर्भ

Nitesh Karale News : ‘५०० की नोट, मटण की बोट और तेरेकोच वोट’, म्हणून विदर्भाची अवस्था वाईट !

Government : सरकार शेतकऱ्याच्या छाताडावर बसाले तयार असते.

सरकारनामा ब्यूरो

Nitesh Karale criticizes Vidarbha leaders : कधी कधी तर असं वाटते की निसर्गच शेतकऱ्याचा दुश्मन आहे की काय. कारण एखाद्या वर्षी पाऊसच येत नाही. अन् आला त एखाद्या वर्षी इतका येते की, पिकांसह जमीनही खरवडून नेते. दोन्हींचे संतुलन बरोबर झाले तरी सरकार शेतकऱ्यांच्या छाताडावर बसाले तयार असते, असे आपल्या खास वऱ्हाडी शैलीत सांगत नितेश कराळे यांनी सरकारवर आसूड ओढले. (Children of farmers also get education and get married)

नितेश कराळे म्हणजेच कराळे गुरूजी आज अख्ख्या महाराष्‍ट्राला ठाऊक आहेत, ते वऱ्हाडी भाषेतील त्यांच्या आगळ्यावेगळ्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे. राज्यातील घडामोडींवर ते नेहमी आपले मत व्यक्त करत असतात. सध्या ते पंढरपूरला वारीमध्ये गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्याही मुलांचे शिक्षण असतात, लग्न असतात. शेतीचा लागत खर्च वाढला आहे आणि निसर्गाचा मार बसल्यानंतर सरकारही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत असल्याबद्दल कराळे सरांनी चीड व्यक्त केली.

बेरोजगारांच्या बाबतीत चांगले धोरण राबवले पाहिजे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जे सांगितले, ते चीनसारख्या देशाने ऐकले, स्वीकारले. परिणामी तो देश प्रगती करतो आहे. पण आपण गेल्या कित्येक वर्षांपासून आहो तेथेच आहोत. ज्या क्षेत्रात जे पीक चांगले पिकते, तेथे क्लस्टर केले पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांनी (Farmers) पिकवलेल्या मालाचा त्याला चांगला फायदा होऊ शकेल.

मी गेल्या दोन दिवसांपासून येथे आहे. पश्‍चिम महाराष्‍ट्रात एक गोष्ट चांगली आहे की, तीन-तीन चार-चार एकरचीच शेते आहेत. पण प्रत्येक शेतात लहानसे का असेना एक घर आहे. शेतकरी सधन आहे. आमच्या विदर्भात १०-१२ एकर शेती लोकांकडे आहे. पण तेथील शेतकऱ्यांची अवस्था खराब आहे. मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात.

पश्‍चिम महाराष्ट्रातील (Maharashtra) नेते आपआपल्या मतदारसंघांमध्ये लक्ष घालताना दिसतात. विकास कसा होईल, यासाठी नेहमी काम करतात. पण आमच्या विदर्भातील नेत्यांचे लक्ष केवळ मलिदा खाण्याच्या मागे असते, असा जोरदार प्रहार नितेश कराळे यांनी विदर्भातील नेत्यांवर केला.

पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा विकासावर भर जास्त, कमीशनवर कमी. तर विदर्भातील (Vidarbha) नेत्यांचा कमिशनवर पूर्ण जोर आहे. विदर्भात अशा विकासाची अपेक्षा करणेही गैर वाटते, कारण ‘५०० की नोट, मटण की बोट और तेरेकोच व्होट’, अशी लोकांची मानसिकता आहे, असे म्हणत त्यांनी लोकांनाही चुकीचे ठरवले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT