Nitesh Rane Sarkarnama
विदर्भ

Nitesh Rane News : मी तर रोजच मासे खातो, पण माझे डोळे ‘तसे’ झाले नाहीत !

Dr. Vijaykumar Gavit : वादग्रस्त विधान मंत्री डाॅ. विजयकुमार गावीत यांनी केले.

सरकारनामा ब्यूरो

MLA Rane talking to reporters at Nagpur airport : मासे खाल्ल्याने डोळे ऐश्‍वर्या रॉयसारखे होतात. ‘मासे खाल्ल्याने डोळे सुंदर होतात, मुली लवकर पटतात’, असे वादग्रस्त विधान मंत्री डाॅ. विजयकुमार गावीत यांनी केले. त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मध्यप्रदेशला जाण्यासाठी आज (ता. २१) नागपुरात आलेले आमदार नितेश राणे यांनी मात्र यावर मिश्‍कील टिपणी केली आहे. (We Konkan people are daily fish eaters)

नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना आमदार राणे म्हणाले, असे असेल तर माझे डोळे आत्तापर्यंत तसे व्हायला पाहिजे होते. कारण आम्ही कोकणातले लोक रोज मासे खाणारे आहोत. गावीतांना विचारतो की, असं कुठलं संशोधन झालं असेल, तर सांगा. त्यामुळे कोकणातील सर्व लोकांचे डोळे ऐश्‍वर्या रॉयसारखे झाले पाहिजे. पण अद्याप तरी तसे काही झालेले नाही.

राऊतांनी सिधुदुर्गमधून लढावे..

संजय राऊतांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी मुंबईतून लढण्यापेक्षा रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून निवडणूक लढण्याचे मी आमंत्रण देतो. आमच्या मैदानात या, मग तुमचे डिपॉझिट जप्त करण्याचे आम्ही बघू, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांना आव्हान दिले.

आमदार राणे म्हणाले, खासदार संजय राऊत हे ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं ऐकलं. परंतु त्यांनी आमच्या मैदानात आलं पाहिजे. सध्या विनायक राऊत तेथे खासदार आहेत. त्या एका राऊताला गाडण्याची तयारी आम्ही केली आहे. आता या राऊतांनासुद्धा गाडून टाकू.

‘सामना’तून काळे धंदे चालतात..

शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामना हे वृत्तपत्र नाही, तर उद्धव ठाकरे यांचा काळा पैसा पांढरा करण्याची ती एक कंपनी आहे. सामनाचा नेमका खप किती आणि जाहिरातींचे उत्पन्न कुठून येते, किती येते, याचा तपास केला पाहिजे. सामना कंपनीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्याची मागणी करणार आहे. कारण सामनाच्या कर्मचाऱ्यांचे पगार महिनोगंती होत नाहीत, हे तेथील काही कर्मचारी सांगतात. उद्धव ठाकरे आणि कंपनीचे काळे धंदे तेथून चालतात, असा घणाघाती आरोप आमदार राणे यांनी केला.

महायुती मजबूत..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बिनसल्याची चर्चा आहे, याबाबत विचारले असता, असे काहीही नाही. महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे. यामध्ये काड्या लावण्याचे काम संजय राऊतांसारखे नेते करत आहे. पण हे सरकार पाडणे सोपे नाही, असे नितेश राणे म्हणाले.

विनायक राऊत यांनी नितीन गडकरींना (Nitin Gadkari) आमंत्रण दिले आहे. याचा अर्थ विनायक राऊत यांनी मान्य केले की की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधान पदाचे उमेदवार होण्याच्या लायकीचे नाहीत. कारण त्यांचेच लोक आधी सांगत फिरायचे की उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार. आता ठाकरेंची लायकी नाही, हे त्यांच्या लक्षात आले म्हणून नितीन गडकरींचे नाव पुढे केले जात आहे. पण गडकरी भाजपचे निष्ठावान आहेत. ते असं कधीही करणार नाही, असे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT