Nitesh Rane and Sanjay Raut Sarkarnama
विदर्भ

NItesh Rane News : एक महिला पण संजय राऊतांच्या मागे पडली आहे, कदाचित तिने तर दिली नसावी धमकी...

Devendra Fadanvis : याची काळजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील.

सरकारनामा ब्यूरो

Program of Modi @9 in Amravati : अमरावतीला मोदी @9 चा कार्यक्रम व काही मेळावे आहेत. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यासाठीच आजचा अमरावती दौरा असल्याचे भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी सांगितले. अमरावतीला जाण्यासाठी आज (ता. नऊ) नागपूर विमानतळावर आले असता आमदार राणे पत्रकारांशी बोलत होते. (Sharad Pawar is the senior leader of the country)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर ते म्हणाले, शरद पवार देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या व आमच्या भूमिका भलेही वेगवेगळ्या असतील. पण आमच्या राज्यात कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. हे महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही, तर भाजप-शिवसेनेचं सरकार आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला.

जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत, तेव्हा अनेक भाजप नेत्याची सुरक्षा कमी करण्यात आली होती. तरीही शरद पवार यांची सगळी काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्या फोनवर कॉल करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याबाबत विचारले असता, मच्छर मारण्यासाठी धमकी देण्याची गरज नाही.

संजय राऊत आणि त्याच्या भावाला नेमकी धमकी कोणाकडून आली हे विचारा. कारणं मी असं ऐकलंय की मुंबईची एक डॉक्टर महीलासुद्धा पण संजय राऊतांच्या मागे पडली आहे. उठसूठ एक डॉक्टर महिला त्यांना धमकी द्यायची, हे आपण माध्यमावर पाहिलं आहे. त्यामुळे त्या महिलेने तर धमकी दिली नाही, ना हे संजय राऊत आणि सुनील राऊतने स्पष्ट करावं, असे नितेश राणे म्हणाले.

२०२४ ला विनायक राऊत खासदार नसणार आणि संजय राऊत बाहेर नसणार, मग सत्ता कुठून येणार. त्यामुळे या नाक्यावरील चर्चांवर त्यांनी आमच्याशी बोलू नये. पत्रा चाळ घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा व एका महिलेनं त्याच्याविरुद्ध तक्रार दिली, तेही एक प्रकरण आहेच. अशा संजय राऊत यांच्या डोक्यावर खूप साऱ्या केसेस आहेत. त्यामुळे त्याला कोणत्या प्रकरणात आतमध्ये घ्यायचं हे येणाऱ्या काळातच कळेल, असेही आमदार राणे म्हणाले. पत्रा चाळ घोटाळ्यात संजय राऊतने मराठी माणसांची घरे लुटली होती. तो काही क्रांतिवीर नाही, तर फार मोठा ४२० आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

सुप्रिया सुळेंना मी एवढं सांगेन की, हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, गृहमंत्री तुमचे नाही आणि मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे नक्कीच नाही. त्यामुळे शरद पवारांची काळजी करण्याचे काहीही कारण नाही. त्याची जेवढी काळजी घ्यायची, ती आमचं सरकार नक्कीच घेईल.

संजय राऊत यांना एवढंच सांगणं आहे, हे अग्रलेख लिहिताना औरंग्याचे विषय आणि दोन तीन औरंग्याचे चाटण्याचे काम अबू आझमी करतोय. हे विषय मोठे करण्याचं काम मुंब्र्याचा आमदार करतोय. त्यामुळे भाजपवर बोलण्यापेक्षा महाविकास आघाडीत हे बोलायला सांगा. कस त्याला ---णावर लाथ मारून बाहेर काढतील, ते बघा. म्हणून स्वतःच्या लायकीनुसार टिका केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी संजय राऊतांना दिला.

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) बाबतीत आक्षेपार्ह भाषेत ट्विट केलं आहे. यावर विचारले असता, हा प्रश्‍न निलेश राणे यांनाच विचारला पाहिजे. तरीही ते माजी खासदार आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे जे योग्य वाटलं, ते त्यांनी ट्विट केलेलं आहे, असे आमदार नितेश राणे (NItesh Rane) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT