Nitin Gadkari and Sanjay Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari News : माजी राज्यमंत्री देशमुखांचे मोठे विधान म्हणाले, तर नितीन गडकरी राजीनामा देतील आणि...

Sanjay Deshmukh : संजय राठोड यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी उतरवणार.

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Deshmukh in Digras : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौरा कालपासून (ता. नऊ) सुरू झाला. या दौऱ्यात त्यांनी गद्दारांवर निशाणा साधला. पोहरादेवी येथे जगदंबा देवीचे दर्शन घेतल्यानंतर दिग्रस येथे कार्यकर्त्यांच्या सभेत त्यांनी खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला. (Bhavna Gawli and Minister Sanjay Rathod were targeted)

संजय राठोड यांनी पक्षासोबत गद्दारी केल्यानंतर दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघातून राठोड यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी उतरवणार असल्याची घोषणा काल खासदार अरविंद सावंत यांनी केली. संजय देशमुख यांनीही दारव्हा-दिग्रसमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. कालच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्याची झलक दिसली.

काल (ता. नऊ) संजय देशमुख यांनी तडाखेबंद भाषण ठोकले. यामध्ये त्यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी आणि दारव्हा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बैलगाडीवाल्यांकडून २०० रुपये हप्ता घेणारा, असे म्हणत देशमुखांनी राठोडांवर गंभीर आरोप केले.

दारव्हा-दिग्रस रस्ता कुणी खाल्ला, असा सवाल करत या रस्त्याचे काम करता-करता सहा ठेकेदार पळून गेले. येथे मंत्री-आमदार (MLA) आणि अधिकाऱ्यांची महायुती झाली आहे. केवळ लुटण्याचे काम सुरू आहे. ठेकेदारासमोर येवढे मोठे तोंड फाडले जाते की, ठेकेदार पळूनच जातो. ड्रग असोसिशननेही मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेले संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या कार्यालयात प्रत्येक कामासाठी पैसे मागितले जातात. त्यामुळे त्रस्त होऊन ते रस्त्यावर उतरले होते. त्यापूर्वी वन खाते असताना बदल्यांमध्ये किती मलिदा लाटला, हेसुद्धा संजय देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपला मोर्चा दिग्रस-दारव्हा रस्त्याकडे वळवला.

देशमुख म्हणाले, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मी विनंती करतो की, त्यांनी एकदा येथे यावे आणि दिग्रस ते दारव्हा रस्त्यावरून प्रवास करावा. एकतर ते मंत्रिपदाचा राजीनामा देतील, नाहीतर ढसाढसा रडतील. देशभर रस्त्यांचे जाळे विणणारे गडकरी या रस्त्याची दुर्दशा बघून त्यांना प्रचंड वेदना होतील. या वेदना या जिल्ह्यातील लोक दररोज भोगत आहेत, असेही देशमुख म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT