Shivsena News, Nagpur Latest News in Marathi
Shivsena News, Nagpur Latest News in Marathi Sarkarnama
विदर्भ

भाजपला अंगावर घ्यायला कुणी तयार नाही, म्हणून नेतृत्व बदलाच्या हालचाली !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख निष्क्रिय आहेत. दोघांपैकी संदीप इटकेलवार यांची तक्रार मुंबईपर्यंत झालेली आहे. दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बदलणार असे वृत्त ‘सरकारनामा’मध्ये प्रकाशित होताच जिल्हा शिवसेनेमध्ये खळबळ उडाली. सध्याच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांपैकी कुणीही आंदोलनांमध्ये दिसत नाहीत, अशी शिवसैनिकांची तक्रार आहे. त्यामुळे जिल्हा प्रमुख बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. (Nagpur Latest News in Marathi)

माजी खासदार प्रकाश जाधव यांचे नाव जिल्हा प्रमुख (Shivsena District Chief) पदासाठी चर्चेत येताच शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांचा पत्ता कट करण्यासाठी अनेक नेत्यांनी मुंबईकडे (Mumbai) धाव घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असल्याने संघटनेला सध्या विस्कळीत करू नका, असा युक्तिवाद केला जात असल्याचे समजते. शिवसेनेने (Shivsena) नागपूर (Nagpur) जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सूर्यवंशी यांना बदलविले आहे. त्यांच्याऐवजी देशमुख यांची नियुक्ती केली आहे. ते खासदार तसेच माजी संपर्कप्रमुख विनायक राऊत यांच्या जवळचे मानले जातात. राऊत जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असताना देशमुख रामटेक विधानसभेचे संपर्क प्रमुख होते. त्यामुळे त्यांना संघटनेतील बारीकसारीक गोष्टी माहिती आहेत. त्यांचा प्रकाश जाधव यांच्यासोबतही जवळचा संबंध आहे. त्यामुळे जाधव जिल्हा प्रमुख होणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे वृत्त कानावर पडताच अनेकांनी मुंबईत धाव घेतली असल्याचे कळते.

प्रकाश जाधव जिल्ह्याचे खासदार होते. यापूर्वी जिल्हा प्रमुखसुद्धा होते. मंगेश कडव यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. सध्या राजू हरणे आणि संदीप इटकेलवार हे दोन जिल्हा प्रमुख आहेत. त्यांपैकी इटकेलवार यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते एकाही आंदोलनात दिसत नसल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. स्वतःच्या गावातील ग्राम पंचायत निवडणुकही लढवण्याची हिंमत त्यांनी दाखविली नाही. त्यामुळे चांगलाच रोष निर्माण झाला होता. अनेकांनी याची तक्रार मुंबईत केली होती. याची शहानिशा करण्यासाठी शिवसेनेने एका समितीही पाठविली होती. दुसरे जिल्हाप्रमुख राजू हरणे अनेक वर्षांपासून जिल्हाध्यक्ष आहेत. प्रकाश जाधव रांगडे शिवसैनिक आहेत. लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. त्यामुळे अशा लढवय्या शिवसैनिकाला जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.

सत्ता असूनही शिवसेना आक्रमक नाही..

राज्यात सत्ता असताना आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही शिवसेना आक्रमक दिसत नाही. प्रत्येकाचे राजकीय हिशेब वेगवेगळे असल्याने भाजपला अंगावर घ्यायला कोणी तयार नाहीत. त्यातूनच नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT