Dr. Babanrao Taywade Sarkarnama
विदर्भ

OBC Federation News : डॉ. तायवाडे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ‘हा’ एकच मार्ग !

Maratha : त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांवर कुणबी असल्याचीच नोंद आढळते.

Atul Mehere

Nagpur District OBC-Maratha Political News : सरकारकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक काढून घेण्यासाठीचा एकच मार्ग आहे आणि त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले असावे, असा अंदाज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला. (His educational documents show that he is Kunbi only)

ओबीसींच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास संविधानिक अधिकरांसाठी लढण्यास ओबीसी समाजातील ४०० जाती तयार आहेत, असा इशाराही डॉ. तायवाडे यांनी दिला. आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना डॉ. तायवाडे म्हणाले, विदर्भातील कुणबी मूळतः कुणबी आहे. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांवर कुणबी असल्याचीच नोंद आढळते. त्यात मराठा शब्द नाही. अमरावती, अकोला, बुलडाणा भागातील पाच टक्के समूहाच्या कागदपत्रांवर मराठा लिहिलेलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा हा समाज आहे आणि कुणबी ही जात आहे. त्यामुळे तेव्हा पंजाबराव देशमुख यांनी मराठा समाजातील लोकांची कुणबी अशी नोंद करण्याची सूचना केली होती. या देशात घटना लागू झाल्यानंतर कोणताही बदल केला गेला नाही. त्यामुळे आज घडीला एखाद्या जातीत बदल करण्याचं अधिकार आहे का, असा सवाल डॉ. बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाच प्रश्न घेऊन गेले असतील, असे वाटते. असे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मध्ये घातलेली आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा उठवावी. त्यानंतर राज्य सरकारला स्वातंत्र्य द्यावं की, त्यांच्या राज्यात मागास जातींचा अभ्यास करून त्यांना आरक्षण द्यावे, असे झाले तर त्याला आमचा आक्षेप नसेल, असेही ते म्हणाले.

कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. असे ज्या दिवशी होईल, त्या दिवशी स्वतःच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी आमची पूर्ण तयारी असेल. जरांगे सरकारवर दबाव तयार करत आहेत. याबद्दल विचारले असता, सर्व लोक सांगत आहेत की, यात एकच मार्ग यात आहे.

तो म्हणजे केंद्र सरकारला विनंती करून आरक्षणाची मर्यादा वाढवून घेणे. विधेयक काढून घेणे. असे केल्यास स्वतंत्रपणे मराठा आरक्षण दिले जाऊ शकते. त्यासाठीच दिल्लीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले असतील, असे डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT