OBC Protester in Chandrapur. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur News : ओबीसी आंदोलन अक्षय लांजेवार, अजित सुकारेंची प्रकृती खालावली

OBC Reservation : आठवडाभरापासून सुरू केलय अन्नत्याग आंदोलन

संदीप रायपूरे

Chimur Kranti Bhumi : ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी गेल्या आठवडाभरापासून चंद्रपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणारे अक्षय लांजेवार, अजित सुकारे यांनी प्रकृती खालावलीय. यातील अक्षय यांनी प्रशासनानं उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलय.

ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी गुरुवारपासून (ता. 7) चिमूर क्रांती भूमीत अक्षय आणि अजित यांनी अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात केलीय. आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर अक्षय आणि अजित यांनी ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू केलाय. नागपूर येथील संविधात चौकात ओबीसी समाजानं आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर चंद्रपुरात अक्षय यांनीही उपोषण सुरू केलं होते.

मंगळवारी (ता. 12) उपोषणाच्या सहाव्या दिवशी अक्षय लांजेवार यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ओबीसी समाजाच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं. मागण्या पूर्ण करण्यात येतील, असं सरकारनं सांगितलं होतं. त्यानंतरही मागण्या मान्य न केल्यामुळे चिमूर क्रांती भूमीतून अन्नत्याग आंदोलनाला 7 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली. चिमूर येथील अक्षय व अजित हे दोन ओबीसी युवक आंदोलन करीत आहेत. वैद्यकिय अधिकारी डॉ. गायधनी यांनी अक्षय लांजेवार यांची तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली.

प्रशासनानं तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेत अक्षय यांना इस्पितळाकडं पाठविलं. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, नामदेव किरसान, सूर्यकांत खनके हे इस्पितळात उपस्थित होते. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. अशात ओबीसींच्या मागण्यांसाठी शासनानं तातडीनं पावलं उचलायला हवी होती. परंतु तसं होताना दिसत नसल्यानं ओबीसी समाजात संताप व्यक्त होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही ओबीसींच्या मागण्याची दखल घेत नसल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अशात अक्षय यांची प्रकृती खालावल्यानं ओबीसी समाजाचं दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन आक्रमक होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारनं ओबीसींच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आता ओबीसी समाजातील नेत्यांनी दिला आहे. चंद्रपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सध्या अजित हे अन्नत्यागाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यांचीही प्रकृती आता खालावत आहे. अशात सरकार ओबीसी समाजातील तरुणांच्या सहनशीलतेचा किती अंत पाहणार असा प्रश्न अक्षय आणि अजित यांच्या कुटुंबानं उपस्थित केलाय. दोन्ही तरुणांचा परिवार सध्या या आंदोलनामुळं चिंतेत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT