Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

OBC Reservation : ओबीसींचे शून्य टक्केही आरक्षण कमी होणार नाही !

Atul Mehere

OBC Reservation News : कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हते, मात्र आता प्रमाणपत्र मिळणे सोपे होईल. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल, फडणवीसांनी आरक्षण दिले होते, मात्र ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांचा निर्णय झाला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आज (ता. २९) नागपुरात पत्रकारांशी बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, ओबीसीमध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत. त्याबद्दलचा निर्णय झाला आहे. ओबीसीचे शून्य टक्केही आरक्षण कमी होणार नाही, मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम आहे.

सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यावर एकमत झाले आहे, ओबीसींवर अन्याय होणार नाही, ओबीसी आरक्षण टिकवण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.

ओबीसीनी घाबरू नये. अधिसूचना काढल्यावर हरकती येणार आहेत, अध्यादेश नाही. पंकजा मुंडेंबाबत बोलताना ते म्हणाले, पंकजा मुंडे यांची भूमिका भाजपपेक्षा वेगळी नाही. सरकारने अधिसूचना काढली आहे, त्यावर आक्षेप मागितले आहेत, सुनावणी होईल, अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सुनावणी होईल, त्यात आपले म्हणणे मांडता येणार आहे.

छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घेतली नाही, कोण काय मत व्यक्त करतो. ईडब्ल्यूएसचे आरक्षण सुरू आहे. आपले मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भुजबळ बसतील आणि कन्फ्युजन दूर करतील. उद्धव ठाकरेंच्या मनासारखा निर्णय लागला नाही, राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला तो विधिमंडळाच्या नियमात आहे. नार्वेकरांची बाजू योग्य आहे, त्यांची निवड योग्य आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मताच्या राजकारणासाठी लोक किती खालच्या स्तराला जातात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे इम्तियाज जलील आहेत. इम्तियाज जलील यांची तक्रार योग्य ठिकाणी करू. महायुतीचे जिल्हा मेळावे झाले. आता विभागीय मेळावे होतील.

भाजप 48 जागांवर महायुतीच्या उमेदवारांना बळ देईल. आमचे सुपर वाॅरीयर काम करतील. 50 हजार युनिट गाव चलो अभियान सुरू करतील. 24 तासांसाठी नेते मुक्कामी जाणार आहेत. संघटनात्मक बांधणी करणार आहे. 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत अभियान राबवणार आहो, असे आमदार बावनकुळे निवडणुकीच्या तयारीबाबत बोलताना म्हणाले.

रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जी मागणी आली आहे, ती स्थानिक पातळीवरची मागणी आहे, केंद्रीय पार्लीयामेंट्री बोर्ड उमेदवार ठरवेल, महाराष्ट्रात आता पक्ष प्रवेशाचे बॉम्ब स्फोट दिसतील. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री यांचं कौतुक करणे, हे मुख्यमंत्री चांगले काम करीत असल्याचे द्योतक आहे, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT