Dr. Ashok Jovtode Sarkarnama
विदर्भ

हीच ती वेळ; ओबीसींनी भोंगे लावणे अन् काढण्याच्या भानगडीत पडू नये...

शांत रहा, भडकू नका व विशिष्ट राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून कोणाचे भोंगे लावण्याच्या व काढण्याच्या भानगडीत पडू नका, असे मत ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे (Ashok JIvtode) यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : ज्या पद्धतीने राज्याच्या विरोधी पक्षातील राजकारणी नेते मंडळी त्यांच्या स्वार्थापोटी धार्मिक गोष्टींचा वापर करून आपल्या पक्षाला राजकीय फायदा होईल व मते वाढतील याकरिता लोकांना भडकवीत आहेत, त्यामध्ये जर आपल्या ओबीसी (OBC) बांधवांनी भाग न घेता जर शांत राहिले, तर आपली ओबीसींची ताकद त्यांना कळेल. त्यामुळे ओबीसींनी भोंगे लावणे अन् काढण्याच्या भानगडीत पडू नये, असे आवाहन ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे (Dr. Ashok Jivtode) यांनी केले आहे.

ओबीसी समाजाशिवाय कोणतीही योजना किंवा मेळावे यशस्वी होत किंमत काय आहे, हे त्यांना कळेल. त्यामुळे ओबीसींनी ओबीसींनी भोंगे लावणे अन् काढण्याच्या भानगडीत पडू नये, असे नाही. हे त्यांना दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. असे झाले तर आपल्या ओबीसींची जातिनिहाय जनगणना करणे व इतर मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडता येईल. म्हणून शांत रहा, भडकू नका व विशिष्ट राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून कोणाचे भोंगे लावण्याच्या व काढण्याच्या भानगडीत पडू नका, असे मत ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय पक्षांनी नेहमीच ओबीसी युवकांचा वापर केला आहे. गर्दी ओबीसींची, पैसा ओबीसींचा, असे नेहमीच झाले. मात्र ज्यावेळी ओबीसींच्या जनगणनेचा विषय येतो, केंद्रात ओबीसी मंत्रालयाचा विषय येतो, ओबीसींच्या रोजगाराचा विषय येतो, ओबीसींच्या न्याय हक्क, अधिकार व मागण्यांचा विषय येतो, तेव्हा मात्र हे विशिष्ट पक्षातील राजकारणी दुर्लक्ष करतात. त्यामुळे आता ओबीसींनी सावध होणे आवश्यक आहे.

यांच्या राममंदिर, हनुमान चालिसा, बाबरी मशीद, नमाज, प्रार्थना या प्रकरणात नेहमीच ओबीसी युवक पुढे राहिले आहेत. मात्र जेव्हा ओबीसींच्या हक्काचा विषय आला, तेव्हा मात्र धर्माचं राजकारण करणारे स्वार्थी राजकारणी नेहमीच ओबीसींना डावलत आले आहे, म्हणून यावेळी ओबीसी युवकांनी भोंगे लावण्याच्या व काढण्याच्या भानगडीत न पडता अलिप्त राहावे. म्हणजे ओबीसींशिवाय राजकारणी आंदोलन यशस्वी करू शकत नाही, हा संदेश जायला हवा, असे मत डॉ. अशोक जीवतोडे यांनी मांडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT