Old pension Scheme News : राज्यात जुनी पेन्शनचा मुद्दा चांगलाच गाजला. जुनी पेन्शन योजना लागू करणे परवडणारे नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशात सभागृहात केले होते. त्याचा फटकाही त्यांना बसला. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा जुनी पेन्शनचा मुद्दा तापू लागला आहे.
खासगीकरणामुळे देशाचे नुकसान होत असून आयुध निर्माणीचे खासगीकरण करण्यात येत आहे. भविष्यात या कंपन्या तोट्यात दाखवून त्या उद्योजकांना विकल्या जातील. याविरोधात संसदेला घेराव घालण्यात येईल. तसेच जुनी पेन्शन लागू करणाऱ्या पक्षाला मदत करण्यात येईल, असा इशारा इंडियन ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ. सी. शिवकुमार यांनी दिला. ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियन अंबाझरीच्यावतीने देशव्यापी घरोघरी साक्षरता मोहिमेला डिफेन्स येथील डॉ. आंबेडकर चौकातून सुरुवात करण्यात आली.
यावेळी सी. शिवकुमार, कामगार नेते बी.बी. मुजुमदार, आशिष पाचघरे, अंबाझरी युनिट महासचिव विनोद कुमार, अनंत भारसाकडे, अबनिष मिश्रा उपस्थित होते. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. जो पक्ष आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जुनी पेन्शन योजना आणि कॉर्पोरेटीकरण व खासगीकरणाचा या बाबींचा फेरविचार करण्याचा समावेश करेल, त्याच पक्षाला देशातील सुमारे १५ कोटी कर्मचारी, कामगार कुटुंबे, मतदान निर्णय घेण्याचा निर्णय जाहीर केला.
देशातील २ लाख कर्मचारी आणि महिलांच्या स्वाक्षऱ्या संकलित करून या समस्यांवर सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी राष्ट्रपतींकडे (President) पाठवले जाईल, असेही सी. शिवकुमार यांनी सांगितले. या कामी आता इंडियन (India) ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी लागले असून लवकरात लवकर संसदेवर धडकणार असल्याचेही निजोयन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य (Maharashtra) आणि केंद्रातील (Delhi) सत्ताधाऱ्यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागणार आहे. न घेतल्यास आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
स्वाक्षरी अभियान कार्यक्रमात विनोद रामटेके, दीपक गांवडे, दिलीप बीरे, उमेश गोमासे, सुधीर चरडे, उमेश कापसे, राकेश खाडे, अरविंद तिवारी, सुनील मंडाले, प्रकाश डागरा, गोमासे, देवा क्षीरसागर, प्रेम सागर, धनंजय शिरपूरकर, गणेश वासनिक, विनोद बालपांडे, प्रकाश घाटोळे, गौतम कुमार, दिनेश तंबाखे, मनोज आंबटकर, पेटकर, सुनील कुमार, कामेश्वर रामटेके, विनोद बारेवार,भारत भैसारे,खुर्शिद पठाण, अमित बैसवार आदी सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.