Prafull Patel Sarkarnama
विदर्भ

Gondia-Bhandara News : ...तरच मी भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक लढवणार !

Prafull Patel : गोंदिया-भंडारा लोकसभा कोणाकडे जातो, त्यावर सर्व निर्भर आहे.

सरकारनामा ब्यूरो

Bhandara-Gondia Politics : गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. मात्र आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप एकत्र आल्याने गोंदिया-भंडारा लोकसभा कोणाकडे जातो, त्यावर सर्व निर्भर आहे. तिन्ही पक्षांनी मिळून माझ्याकडे जबाबदारी दिली, तरच मी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. (Only then I will contest from this constituency)

आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक संभ्रम दिसत आहेत. या संदर्भात आज (ता. २४) प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असे वक्तव्य भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी केले होते. त्यावर जयंत पाटील आमच्या सोबत नाहीत. त्यामुळे उद्या ते काय निर्णय घेतील यावर मी बोलणे योग्य नाही, असे पटेल म्हणाले.

कोणीही माझा फोटो वापरू नये, अन्यथा मी कोर्टात जाईल, असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. त्यानंतरही अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांचे फोटो वापरलेले होते. काल (ता. २३) भंडारा येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बॅनरवर शरद पवारांचे फोटो झळकले.

मात्र आज गोंदियामध्ये कार्यकर्ता मेळाव्याच्या बॅनरवर कुठेही शरद पवार यांचे फोटो दिसले नाही. यावर प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारले शरद पवार आमच्यासाठी वंदनीय आहेत. भविष्यातही ते आमचे नेतेच राहणार आहेत, असे ते म्हणाले.

भाजपचे १०६ आमदार आहेत. मी जर भाजपच्या ठिकाणी असते तर मला खूप दुःख झाले असते, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता भाजप आणि आम्ही एकमेकांना मनापासून साथ द्यायचे ठरविले आहे. त्यामुळे २०२४ मध्ये महायुतीची सरकार पुन्हा एकदा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार (Ajit Pawar) परत येणार असे वक्तव्य केल्यानंतर यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता आम्ही फार विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राजकारणात असे निर्णय वेळोवेळी बदलत नसतात असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

भाजपने तीन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यावर भाजपने आजपर्यंत काय केलं, काही नाही केलं, हा तर विषयच वेगळा आहे. आम्ही भाजपला मनापासून साथ द्यायचे ठरविले आहे, असे प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT