Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
विदर्भ

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांवर तुटून पडले विरोधक, सरकार अडचणीत येणार ?

सरकारनामा ब्यूरो

Maarashtra Assembly Winter Session News : वाशीम (Washim) जिल्ह्यातील ३७ एकर गायरान भूखंड पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे देण्याचा निर्णय घेणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राजीमाना द्यावा आणि त्यांची चौकशी करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सदस्यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देत, उपसभापतींसमोर येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे परिषदेचे कामकाज संपूर्ण दिवसांसाठी तहकूब करावे लागले. सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अंबादास दानवे यांनी २५९ सूचना देत, या विषयावर चर्चेची मागणी केली होती. यावेळी दानवे यांनी सत्तारांवर आरोप करीत, रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर (Nagpur) अशा अनेक ठिकाणी सत्तार यांनी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी पद्धतीने भूखंड, वाळूचे ठेके, कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन आपल्या अधिकार कक्षात नसताना विकल्याचा किंवा वाटप केल्याचा आरोप केला. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील सत्तार यांना फटकारले होते याचा उल्लेख देखील दानवे यांनी केला.

अशा मंत्र्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे, तसेच सभागृहात यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली. दरम्यान अनिल परब यांनीही सरकारला धारेवर धरत सत्ता आल्यापासून भुखंड घोटाळे समोर येत असल्याचा आरोप केला. तसेच जाता जाता सर्व काही फावडा मारल्याप्रमाणे काम केल्याचीटी टीका केली. दरम्यान सदस्यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करीत, घोषणाबाजी केली. यावेळी चर्चेची सूचना फेटाळून उपसभापती निलम गोऱ्हे यांनी संपूर्ण दिवसांसाठी कामकाज तहकूब केले.

सत्तारांनी दिले अधिकाऱ्यांना टारगेट..

विधानपरिषदेचे सदस्य एकनाथ खडसे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांद्वारे राज्यातील अधिकाऱ्यांना १५ कोटी रुपयांची वसुली करण्याचे टारगेट दिले. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तारांद्वारे राज्यातील सर्व दुकानदार आणि अधिकाऱ्यांद्वारे पहिला हप्ता गेल्याचे ते म्हणाले.

अशी आहेत प्रकरणे..

- ३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीररित्या दिले.

- सविता थोरात यांची मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद रत्नागिरी कोकण प्रादेशिक विभागिय आयुक्त या प्रकरणातही कोकण विभाग आयुक्त व अधिकारी यांना अज्ञानात ठेऊन सत्तार यांनी निर्णय घेतला.

- संभाजीनगर येथील जयेश इन्फ्रा सावंगी नावाच्या कंपनीला सत्तार यांनी अधिकार नसतानाही नियमबाह्य व बेकायदेशीर आदेश दिले होते.

-संभाजीनगरातही अधिकार नसताना वाळू ठेकेदार यांना वाळूपत्ता बदलून देण्याचं काम केले.

-संभाजीनगर जिन्सी येथील कृषी बाजार समितीच्या जागेबाबत ही सत्तार यांनी कार्यक्षमतेबाहेर जाऊन चुकीचा निर्णय दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT