Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : आमचं हिंदुत्व कुणा येऱ्या गबाळ्याचं नाही; नाना पटोले स्पष्टच बोलले

Maharashtra Congress and Veer Savarkar : सावरकरांवरून राज्य काँग्रेसाची भूमिका आक्रमच

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : 'मी सावरकर नाही, मी माफी नागणार नाही', असे विधान काँग्रेस नेते, माजी खासदार राहुल गांधी यांनी केले होते. या विधानानंतर राहुल गांधी यांच्यावर भाजपने टीका केली. तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचा आपमान सहन करणार नाही, असा इशाराही दिला होता.

दरम्यान, देशातील विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यापुढे सावरकरांबद्दल विधान करणार नाही, असे स्पष्ट केले होते. राज्य काँग्रेस पक्ष मात्र सावरकरांच्या मुद्द्यावर अजूनही मवाळ भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसने सत्याग्रह यात्रेचे आयोजन करणार आहे. ठाण्यातील सत्याग्रह यात्रेत सावरकरांचा फोटो लावणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर ही बाब मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळली आहे.

ठाण्याच्या शहराध्यक्षांनी काँग्रसच्या सत्याग्रह यात्रेदरम्यान सावरकरांचा फोटो लावण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याबाबत नागपूर येथे पटोले (Nana Patole) यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर पटोले म्हणाले की, "ठाण्याचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्याकडून त्याबाबत माहिती घेतली आहे. त्यांनी सावरकरांच्या फोटोबाबत कुठलेही वक्तव्य केलेले नाही, असे सांगितले आहे."

यानंतर त्यांनी आम्हाला येऱ्या गबाळ्याचे हिंदुत्व मान्य नसल्याचे पटोले यांनी सावरकरांचे नाव न घेतला सांगितले. पटोले म्हणाले, "आमचे हिंदुत्व शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे. आमचे हिंदुत्व येऱ्या गबाळ्याचे नाही. ही भूमिका आम्ही सातत्याने मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाजांनी हिंदवी स्वाराज्याची स्थापना केली होती, त्या हिंदुत्वाचे आम्ही समर्थन करतो. ते हिंदुत्व सर्वसमावेश आहे. मात्र इतर कुणाचेही हिंदुत्व आम्हाला मान्य नाही."

दरम्यान, सावरकर विषयावरुन सध्या राहुल गांधी शांत असल्याचे दिसत आहे. त्यांनी सावरकरांवर केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टही डिलीट केल्या आहेत. असे असतानाही राज्य काँग्रेस पक्षाची सावरकरांबाबतची भूमिका कायम असल्याचे दिसून येत आहे. सत्याग्रह यात्रेत सावरकरांचा फोटो लावण्यासाठी पक्षातून विरोध असल्याचे समोर आले आहे.

(Edited by - Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT