Gunaratna Sadavarte Sarkarnama
विदर्भ

Gunaratna Sadavarte : पाकिस्तानातून लग्न करून आलेल्या महिलांमागे 'मॅरेज जिहाद', तर नाही ना? गुणरत्न सदावर्तेंना वेगळाच संशय

Gunaratna Sadavarte in Yavatmal demands investigation into possible terror links of Pakistani women who married and settled in India : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यवतमाळ इथं लग्न करून भारतात आलेल्या पाकिस्तानी महिलांबाबत वेगळीच शंका व्यक्त करत तपासण्याची मागणी केली.

Pradeep Pendhare

Yavatmal news : वकील गुणरत्न सदावर्ते त्यांच्या बेधक विधानासाठी प्रसिद्ध आहे. जम्मू-काश्मीर पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान या दोघा देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारताने पाकिस्तानमधून आलेल्या नागरिकांचे व्हिसा रद्द करू, बेकायदेशीरपणे भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे.

स्थानिक पोलिसांच्या तपासणीत, पाकिस्तानमधून भारतात लग्न करून आलेल्या महिलांची संख्या मोठी असल्याचे समोर आलं. याबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी वेगळीच शंका उपस्थित करत त्याच्या चौकशीची मागणी केली.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "ज्या हजारो महिला लग्न करून पाकिस्तानातून भारतात (India) आलेल्या दिसत आहेत, त्यामागे असे लक्षात येत की, 'मॅरेज जिहाद' आहेत का? हे सुद्धा आता तपासणी आवश्यक आहे. जर हे 'मॅरेज जिहाद' यात असेल तर याला प्रेम, याला लग्,न त्या संकल्पनेत मोडला जाऊ नये, हे एक टेरिस्ट गतिविधी, हे एक अंडरवर्ल्ड क्रॉस बॉर्डरिझम, हे ठरवून केलं, चाललंय, या मॅरेजला पूर्णविराम, फुल स्टॉप येणे आवश्यक आहे". हे लग्न नसून ही एक म्हणजे आतंकी कारवाईची किंवा ही अत्यंत कारवाईला अंजान देण्यासाठीची प्रक्रिया आहे का, हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे, अशी मागणी सदावर्ते यांनी केली.

कोकणामध्ये (Konkan) एका मदरशाचा दाखला देताना, यवतमाळ, हिंगोली नांदेड जिल्ह्यातील मदरशांमध्ये, खास करून अतिदुर्गम भागामधील मदरशे आहेत, त्यांचे पिरॉडिकल तपासणी झाली पाहिजे, अशी मोठी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

आज कश्मीरमध्ये आमच्या हिंदुस्तानी नागरिकांनी भोगलं, मग त्याच प्रकारचं काही इंटरनल इन सेक्युरिटी तयार झालेली आहे का? त्याच्यामुळे या मदरशांच्या बाबतीत तिसरा डोळा उघडून ठेवला पाहिजे, बघितलं पाहिजे, या मदरशांमध्ये काय चाललेलं आहे. विष्णू वैश्विक दृष्ट्या प्रभू श्रीरामा, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, खुले विचार आहेत. शाहरूख खान, सलमान खानसारख्या सेलिब्रिटींनी सुद्धा आता मदरशांमध्ये काय चाललंय हे गांभीर्याने घेतलं पाहिजे, असंही सदावर्ते यांनी म्हटले.

सोयाबीनला भाव द्या

सोयाबीनचा भावावर शेतकऱ्यांच्या कष्टाप्रकारे, जो हंगामी शेतकरी, जो पाण्याखालचा म्हणजे, कोरडवाहू शेतकरी, त्या शेतकऱ्याला जर त्याच्या श्रमाचे म्हणजे साडेचार हजार, पाच हजार त्याला खर्च आहे, त्याच्या श्रमाचे शंभर रुपये रोज जर त्याला पडत असेल, तर ते अत्यंत वेदनादायी आहे. या वेदनांचा महायुती सरकारने विचार करावा. सोयाबीनला किमान साडेसात हजार रुपये, तरी भाव द्यावा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली.

मंत्री नाईक यांना साकडं

सर्वपक्षीय लोकांनी, जी मागणी लावून धरलेली आहे, स्वतंत्र विदर्भाची, त्या मागणीला एक चालना मिळावी, यासाठी हा दौरा आहे. अकोला, नागपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती येथून आम्ही पदाधिकारी आलो आहोत. या मागणीसाठी आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुढाकार घ्यावा, आणि स्वतंत्र विदर्भाची चळवळ ही अत्यंत शक्तिशाली करावी, असे आवाहन गुणरत्न सदावर्ते यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT