Pankaja Munde Sarkarnama
विदर्भ

Pankaja Munde : पालकमंत्रिपदावरून पंकजा मुंडेही नाराज; म्हणाल्या, ‘मी बीडची मुलगी, बीडचे पालकमंत्रिपद मिळाले...’ (Video)

Mahayuti Government Guardian Minister : मला जालन्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी अनुभव म्हणून मी घेत असते.

Rajesh Charpe

Nagpur, 20 January : पालकमंत्रिपदावरून महायुतीत सध्या चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. ज्यांना मिळाले तेही नाराज; नाही मिळाले तेसुद्धा नाराज असल्याचे दिसत आहे. दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला दोनच दिवसांत स्थगिती देण्याची नामुष्कीसुद्धा सरकारवर ओढावली आहे. नाराजांमध्ये आता पंकजा मुंडे यांचाही समावेश झाला आहे. बीडची मुलगी असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले असते, तर जास्त आनंद झाला असता, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

बीड (Beed) जिल्हा मुंडे यांच्या नावाने ओखळला जातो. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे येथील प्रमुख नेते आहेत. यापैकी धनंजय मुंडे सध्या वादात सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपच नव्हे; तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही केली जात आहे. वादाची पार्श्वभूमी असल्याने धनंजय मुंडे यांच्यावर कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आलेले नाही. बीड जिल्हा सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याकडेच ठेवला आहे तर जिल्ह्याच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याचे पालकत्व सोपवण्यात आले आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) आज नागपूरच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्या वेळी त्यांना पालकमंत्रिपदाबाबतची नाराजी लपवता आली नाही. त्या म्हणाल्या, यावर मी अगोदरच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मला जालन्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी अनुभव म्हणून मी घेत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला मनासारखे काम करायला मिळेल, असे नाही. मी पूर्वी पाच वर्षे कोणत्याही पदावर नसताना पूर्ण वेळ संघटनेचे काम केले.

मी बीडची मुलगी आहे. त्यामुळे मला बीडचे पालकमंत्रिपद मिळाले असते, तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती. आणखी आनंद झाला असता. माझा पाच वर्षांतील कार्यकाळ बीड जिल्ह्यासाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहील. आता झालेल्या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शविता मिळालेल्या संधीमध्ये जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जालन्याकडे मला दुप्पट लक्ष मला द्यावे लागेल. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत, ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील, असा मला विश्वास आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत कोण, कोणाला काय म्हणाले यावर मी कधीच बोलत नाही. माझ्या भूमिकेवर  मी  बोलू  शकेल, असे सांगून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बोलण्याचे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT