Villagers in Janwal village, Latur, protest as BJP leader Pankaja Munde is stopped from paying tribute to Dr Babasaheb Ambedkar during election campaigning. Sarkarnama
विदर्भ

Pankaja Munde Controversy : प्रचारासाठी आलेल्या पंकजा मुंडेंना ग्रामस्थांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यापासून रोखलं, पण का?

Latur Ambedkar Statue Protest : सध्या राजकीय नेत्यांकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा प्रचार जोरात सुरू आहे. याच प्रचाराच्या निमित्ताने भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये आलेल्या पंकजा मुंडेंना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

Jagdish Patil

Latur News, 04 Feb : भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांना लातूर जिल्ह्यातील जानवळ गावातील ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यापासून रोखल्याची घटना समोर आली आहे.

सध्या राजकीय नेत्यांकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा प्रचार जोरात सुरू आहे. याच प्रचाराच्या निमित्ताने भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये आलेल्या पंकजा मुंडेंना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसाठी लातूरमधील जानवळ गावात आलेल्या पंकजा मुंडे यांनी सभेपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

शिवाय सभेनंतर जेव्हा मुंडे या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेल्या तेव्हा स्थांनिकांनी त्यांना रोखलं. यावेळी ग्रामस्थांचा वाढता विरोध आणि संताप पाहता मुंडेंनी अभिवादन न करताच घटना स्थळावरून काढता पाय घेतला. सध्या, या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्याआधी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना देखील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण झाले.

मात्र, महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने महिला वन अधिकाऱ्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. शिवाय यानंतर अनेक ठिकाणी महाजन यांचा निषेध करण्यात आला होता. त्यानंतर मंत्री महाजन यांनी या प्रकरणी भूमिका मांडून आपल्याकडून अनवधानाने बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राहिल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT