Anil Deshmukh and Parambir Singh
Anil Deshmukh and Parambir Singh Sarkarnama
विदर्भ

देशमुखांवर आरोप करणारे परमबीरसिंह सीएम फंडात भरणार १५००० रुपये...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे परमबीरसिंह अनेक दिवसांनंतर आज चौकशीसाठी चांदिवाल आयोगासमोर हजर झाले. गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम ते आता आठवडाभरात मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहेत.

परमबीर यांना गैरहजर राहिल्याबद्दल १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, याप्रकरणी एक मोठा दिलासाही त्यांना मिळाला आहे. त्यांच्या विरोधातील जामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आला आहे. परमबीर यांना १५ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. ही रक्कम आठवडाभरात मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची हमी देखील त्यांना दिली आहे. दरम्यान, सध्या आयोगासमोर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी सुरू आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीसमोर परमबीर सिंह आज हजर झाले. सिंह यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे मोठा गौप्यस्फोट करत या सर्व प्रकरणावर पडदा टाकला आहे.

परमबीरसिंहांची माघार..

परमबीरसिंह हे आज पहिल्यांदाच चौकशी समितीसमोर हजर झाले. यावेळी त्यांनी वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले. तसेच याप्रकरणी समितीसमोर सादर करण्यास माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला. तसेच, कुठल्या साक्षीदाराची मला उलटतपासणीदेखील करायची नाही, असे त्यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपातून अधिकृतरीत्या माघार घेतली आहे, असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याआधी परमबीरसिंह चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ करीत होते. वकिलांच्या मार्फत समितीला हजर राहू शकत नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. देशमुखांवर केलेले आरोप हे ऐकीव माहितीच्या आधारे केले होते. त्यामुळे समितीसमोर येण्याचा काही उपयोग नाही, अशी भूमिका त्यांच्या वकिलांनी घेतली होती. या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे सविस्तर बाजू मांडण्याचीही तयारी त्यांनी दाखवली होती. अखेर समितीने परमबीरसिंह यांना चौकशीला हजर राहावे, यासाठी समन्स बजावले होते. त्यांना २९ नोव्हेंबरला चौकशीस हजर राहण्यास बजावण्यात आले होते आणि ते आज चौकशीसाठी हजर झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT