Parinay Fuke and Radhakrishna Vikhe Patil
Parinay Fuke and Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
विदर्भ

Bhandara - Gondia News: ५ ब्रास वाळूचा प्रश्‍न मिटला, परिणय फुकेंनी केला होता पाठपुरावा !

सरकारनामा ब्यूरो

Pradhan Mantri Awas Yojana: भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली. पण बांधकामासाठी लागणारी वाळू महाग असल्याने बांधकामाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी या प्रश्‍नाचा पाठपुरावा केला आणि आता गरिबांना ५ ब्रास वाळू मोफत मिळणार आहे.

राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागासलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली. बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळण्यामध्ये महाग वाळूने अडचण निर्माण केली होती. बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या खिशापेक्षा घरे महाग, अशी स्थिती झाली होती. डॉ. परिणय फुके यांनी पाठपुरावा करून अडथळे दूर केले.

पंतप्रधान आवास योजनेमध्ये अधिकतर गरीब मजुरांचा समावेश आहे. घरे बांधताना येणाऱ्या अडचणी या लोकांनी डॉ. फुके यांना सांगितल्या. वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे कशा अडचणी येतात, याचा पाढाच मजुरांनी त्यांच्यासमोर वाचला. त्यानंतर परिणय फुके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन मजुरांची समस्या त्यांना सांगितली आणि शासनातर्फे ५ ब्रास वाळू मोफत देण्याची मागणी केली.

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी परिणय फुकेंच्या मागणीची तातडीने दखल घेतली. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेमधील लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता गरिबांची घरे बांधण्याच्या कामाला गती मिळणार आहे. वाळूचा प्रश्‍न सुटल्यामुळे लाभार्थी मजूर वर्ग वेगाने घरे बांधण्याच्या कामी लागणार आहे.

पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना राबविताना कोणत्याही अडचणी येऊ नये, अशा सूचना डॉ. परिणय फुके यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. कुठलीही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. वाळूप्रमाणे या कामात येणारी कुठलीही समस्या तात्काळ सोडविण्यात येईल, असेही डॉ. परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT