Dr. Parinay Fuke 
विदर्भ

Parinay Fuke : धान उत्पादकांसाठी परिणय फुके ठरले 'देवदूत'

Farmers Compensation : मिळणार हेक्टरी 27 हजार नुकसानभरपाई

अभिजीत घोरमारे

Parinay Fuke : भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी परिणय फुके हे देवदूत ठरले असून, त्यांच्या अथक प्रयत्नांनी शेतकऱ्यांच्या पदरी मोठी मदत मिळाली आहे. भंडारा - गोंदिया जिल्ह्यांतील धान उत्पादकांना हेक्टरी 27 हजारांची मदत मिळणार आहे. राज्यातील महायुतीच्या सरकारमुळे हे शक्य झाल्याचा दावा परिणय फुके यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकत्रित निर्णयामुळे हे शक्य झाल्याचे परिणय फुके म्हणाले.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत मागील वर्षी 2023 मध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांवर आलेले अस्मानी संकट लक्षात घेता या संकटात दोन्ही जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासन स्तरावर योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान, या मागणीचा पाठपुरावा करत माजी मंत्री भाजप नेते डाॅ. परिणय फुके यांनी सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मागितली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारने भंडारा, गोंदियातील शेतकऱ्यांना हेक्टरी 27 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती डाॅ. परिणय फुके यांनी दिली. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्यांचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांचीही उपस्थिती होती. माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना अवकाळी पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांतील भातपिकाचे मोठे नुकसान व कापणी झालेल्या धानाच्या ढिगाऱ्यांची माहिती दिली होती. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान व किडीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांची माहिती देण्यात आली.

डाॅ. फुके यांनी देवेंद्र फडणवीस यांना याविषयी माहिती देत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची गरज वर्तवली होती. त्याचबरोबर शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी आग्रही भूमिका डाॅ. फुके यांनी घेतली. शासनाकडे हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई देऊन आर्थिक मदतीची मागणी केली होती.आर्थिक संकटाची गांभीर्याने दखल घेऊन आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी शासनाने अधिकाऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्याची मागणी ही त्यांनी केली होती. दरम्यान, दोन्ही जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देऊन सरकारने आश्वासन पूर्ण केले असून, हेक्टरी 27 हजार रुपयांची मदतीची घोषणा केली आहे.

ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होईल, असा विश्वास माजी मंत्री फुके (Parinay Fuke) यांनी 'सरकारनामा'ला बोलताना व्यक्त केला. दरम्यान, राज्य शासन प्रत्येक स्तरावर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत आणि यशस्वी करण्यासाठी सरकार निर्धाराने काम करत असल्याचे फुके म्हणाले.

Edited By - Sachin Deshpande

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT