Parinay Fuke and Uddhav Thackeray  Sarkarnama
विदर्भ

Parinay Fuke on Uddhav Thackeray : 'शिल्लक गटाचे उद्धवराव...' म्हणत परिणय फुकेंनी व्यंगचित्रातून दिलं फडणवीसांवरील टीकेला प्रत्युत्तर!

Rajesh Charpe

Parinay Fuke and Uddhav Thackeray Cartoon : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून 'एकतर तू राहशील किंवा मी राहीन' असा एकेरी उल्लेख करून टीका केल्याने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या फेसबुकवर 'आपण कोण आहोत, आपले एकूण कर्तृत्व काय ? अशा कमेंटसह एक व्यंगचित्र व्हायरल करून उद्धव ठाकरे यांना प्रत्त्युतर दिले आहे. त्यांच्या या व्यंगचित्रांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

व्यंगचित्रात उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे एका बिळातून ज्यावर मातोश्री 2 असं लिहिलेलं आहे, त्यातून बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ''आपण कोण आहोत, आपले एकूण कर्तृत्व काय ? याची थोडीही जाणीव नसताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शिल्लक गटाचे उद्धव राव'' असा मजकूर त्यांनी व्यंगचित्राबरोबर लिहला आहे.

शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना 100 जन्म घ्यावे लागतील अशा शब्दात सुनावले आहे.

यावर सध्या राज्यात भाजप(BJP) आणि शिवसैनिकांमध्ये रोज खडाजंगी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्या मार्मिक मासिकात व्यंगचित्र प्रकाशित करून विरोधकांवर टीका करायचे. उद्धव ठाकरे हे ‘सामना‘मध्ये व्यंगचित्र प्रकाशित करून महायुतीच्या नेत्यांवर अधूनमधून टीका करीत असतात. आता परिणय फुके यांनीही व्यंगचित्राच्या भाषेतून त्यांना प्रत्त्युतर दिले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT