Dr. Parinay Fuke and Others.
Dr. Parinay Fuke and Others. Sakarnama
विदर्भ

Parinay Fuke News : डॉ. फुकेंनी १५ दिवसांत सोडवला कुणबी समाजाच्या जमिनीचा प्रश्‍न !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur District's Katol News : नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्‍यातील डोंगरला गावातील महसूल व वनविभागाच्या ताब्यातील जमिनीसाठी कुणबी समाज संघटनेने समाज भवनासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली होती, मात्र ही जमीन कुणबी समाजाला मिळू शकली नव्हती. पण माजी वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी अवघ्या १५ दिवसांत ही जमीन समाजाला मिळवून दिली. (Kunbi community could not get this land)

कुणबी समाजाने डोंगरला गावातील जमीन समाजकार्यासाठी शासनाकडे मागितली होती. पण महसूल विभाग आणि वन विभागाच्या क्लिष्ट कार्यवाहीमध्ये ही जमीन समाजाला मिळू शकली नव्हती. सरकारी काम अन् सहा महिने थांब, या उक्तीचा प्रत्यय कुणबी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आला. कारण लालफितशाहीत हे काम अडकले होते. अखेर त्यांनी डॉ. फुके यांना या कामी लक्ष घालण्याची मागणी केली.

कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.परिणय फुके यांच्याकडे ही समस्या मांडून तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यांनी तात्काळ दखल घेत कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह नागपूरचे जिल्हाधिकारी आणि उप वनसंरक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील डोंगरला येथील शासकीय पडीत जमीन कुणबी समाज भवनाच्या बांधकामासाठी कुणबी समाज संघटनेला देण्याची मागणी त्यामध्ये केली.

या प्रकरणाची तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) डॉ. फुके यांना आश्वस्त करून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. या जमिनीच्या प्रकरणावर कुणबी सेवा संस्थेला मौजा डोंगरला येथील वन परिमंडल ईसापूर सर्व्हे क्रमांक ११४ अंतर्गत येणाऱ्या एकूण ६.३६ जमिनीपैकी ०.९६ शासन जमिनीचा पट्टा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६ चे कलम ३(१) अन्वये उल्लेखीत (ड) सामाजिक केंद्र प्रयोजन अंतर्गत देण्याचे मंजूरी पत्र देण्यात आले.

परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांनी कुणबी समाजाच्या जमिनीचा प्रश्‍न अवघ्या १५ दिवसांत सोडवला. या जमिनीचे दस्तावेज सुपूर्द करताना राजू डेहनकर, समीर उमप, जयंतराव टालाटुले, नितीन डेहनकर, राजू हरणे, प्रकाश वसू, कुणबी सेवा संस्था काटोलचे अध्यक्ष रमेश फिरके, अशोकराव काकडे, सुधाकर सांभारतोडे, रमेश पोद्दार, संजय भोंडे, विठ्ठलराव काकडे, विजय धोटे, सुनील राऊत, स्वप्निल राऊत, संदीप सरोदे, संदीप वंजारी, अनिकेत अंतुरकर, नीलिमा अरसडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT