Dr. ParinayFuke Sarkarnama
विदर्भ

Parinay Fuke On Kunbi : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांचा कडाडून विरोध !

Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे.

Atul Mehere

Gondia Political News : मराठा आरक्षणाचा राज्य सरकारसाठी दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपविण्यात सरकारला यश आले आहे. असे असले तरी जात प्रमाणपत्राचा तिढा अद्यापही कायमच आहे. (Marathas should be given separate reservation without reservation from OBC category)

अशात गोंदियात आयोजित कुणबी जनआक्रोश सभेत भाजपच्या एका माजी राज्यमंत्र्यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास कडाडून विरोध व्यक्त केला आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही केली आहे.

या मागणीसाठी चंद्रपुरात (Chandrapur) अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. अशात शनिवारी (ता. १६) गोंदियात पार पडलेल्या कुणबी जनआक्रोश मोर्चात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारी निर्णयाचा एकमताने विरोध करण्यात आला. कुणबी जनआक्रोश सभेत बोलताना माजी मंत्री व भाजप नेते डॉ. परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांनीही सरकारच्या निर्णयाशी असहमत असल्याचे मत व्यक्त केले.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देणे सुरू ठेवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा ईशाराही डॉ. फुके यांनी दिला. यापूर्वीही डॉ. फुके यांनी या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले होते. मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे. या आरक्षण देण्याला कोणताही विरोध नाही. परंतु हे आरक्षण देताना ओबीसी (OBC) समाजावर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

मराठा आणि ओबीसी समाजाचे हक्क अबाधित राहावे, यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही साकडं घातलं होतं. परंतु आता सरकारकडून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने कुणबी समाजासह डॉ. फुके यांनीही विरोध सुरू केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मराठा समाजाच्या आंदोलनांचा जोर थोडा कमी झाला असला तरी ओबीसी समाजाच्या विरोधामुळे सरकारपुढे असलेला आरक्षणाचा पेच कायमच आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT