Dr. Parinay Fuke and Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Parinay Fuke on Wadettiwar : आता वडेट्टीवारांचे जात प्रमाणपत्र तपासावे लागेल, परिणय फुके संतापले !

Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाची वकिली करण्याचा अधिकार कोणी दिला?

Atul Mehere

Vidarbha Political News : राज्याचे माजी राज्यमंत्री तथा ओबीसी नेते डॉ. परिणय फुके हे कॉंग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याच्या वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर डॉ. फुके यांनी संताप व्यक्त केला. (Who gave Wadettiwar the right to advocate for the OBC community?)

परिणय फुके यांनी आपला संताप समाज माध्यमावर व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेनंतर आता त्यांचे जात प्रमाणपत्र तपासण्याची वेळ आली असल्याचे फुके म्हणाले. दरम्यान वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाची वकिली करण्याचा अधिकार कोणी दिला, असा परखड सवालही डॉ. फुकेंनी केला.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जालन्यात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे ठाम असल्याने विविध पक्षांकडून राजकीय मते व सल्ले त्यांना येऊ लागले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाबाबत मत व्यक्त करत ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवून मराठा समाजाला समाविष्ट करून घेतले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्याबद्दल ओबीसी समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यात ओबीसी नेते डॉ. परिणय फुकेसुद्धा मागे राहिले नसून त्यांनी परखड शब्दात वडेट्टीवार यांचा समाचार घेतला आहे.

वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना ओबीसी समाजाची वकिली करण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांना कोणी समाजाचे नेतृत्व करण्याचे वकील पत्र दिले का, असा सवालही डॉ. फुके (Dr. Parinay Fuke) यांनी वडेट्टीवार यांना विचारला आहे. आम्ही वडेट्टीवार यांच्या भूमिकेचा विरोध करत असल्याचे फुके म्हणाले.

दरम्यान विजय वडेट्टीवार ज्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अडीच वर्षे मंत्री होते, तेव्हा समाजाला त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. त्यांनी ओबीसी समाजासाठी एकही ठोस निर्णय घेतला नाही. कोणतीही योजना आणली नाही. खरं तर विजय वडेट्टीवार यांचं जात प्रमाणपत्र पाहण्याची वेळ आता आली आहे. वडेट्टीवार आंध्र प्रदेशातील एका गावातील आहेत. तेथून ते गडचिरोलीला आले, अशी माझी माहिती आहे.

वडेट्टीवार खरच महाराष्ट्राचे आणि खरोखर ओबीसी आहेत का, हे तपासावं लागणार आहे. मात्र एका वकिलाप्रमाणे ओबीसी आरक्षणात मराठ्यांना समाविष्ट करण्याचा सल्ला देण्याचा त्यांना अधिकार काय, असाही सवाल फुके यांनी केला. यावेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात लावण्याची कुणातही नाही, असे म्हणत त्यांनी एक प्रकारे वडेट्टीवारांना इशाराच दिला आहे.

आधीच ओबीसी आरक्षणात अनेक जातींचा समावेश आहे. त्यामुळे ओबीसींचा विकासच अजून पूर्णतः झाला नाही. त्यात अजून मराठा समाजाची भर पडणे चुकीचे होईल. त्यामुळे आम्ही त्याच्या तीव्र विरोध करू. मराठा आरक्षण व ओबीसी समाजाचा विरोधात्मक दबाव लक्षात घेता सरकार काय निर्णय घेणार, हे बघावे लागणार आहे, असेही डॉ. परिणय फुके म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT