Chandrashekhar Bawankule and Nana Patole
Chandrashekhar Bawankule and Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : नाना पटोलेंनी आता होळीला नमस्कार करून प्रार्थना करावी, असं का म्हणाले बावनकुळे?

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule and Nana Patole News : उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठे करण्यासाठी किती पैशाचा गैरवापर होतो, हे सर्वांना माहिती आहे.

तिन्ही पक्ष त्यांचे कार्यकर्ते त्याच्या सभेला पाठवितात, उद्धव ठाकरेंच्या मागे सहानुभूती मिळेल व त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला होईल, असे त्यांना वाटते. परंतु त्यांना सहानुभूती मिळणार नाही, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आमदार बावनकुळे आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेले जे नगरसेवक, लोकप्रतिनिधी शाखाप्रमुख व कार्यकर्ते आहेत जे शिंदे यांची शिवसेना व धनुष्यबाणाकडे जाऊ नये, त्यासाठी त्यांची पक्ष वाचविण्याची धडपड सुरू आहे.

शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे पाहिले आहेत, त्यांनी हिंदुत्ववादी विचाराशी तडजोड केली. त्यामुळे शिवसेनेचा कुणीही कार्यकर्ता उद्धवजीसोबत राहायला तयार नाही.

त्यांच्याकडे असेलेले कार्यकर्ते काही शिंदेंकडे जातील तर काही आमच्याकडे येतील, असाही दावा त्यांनी केला. शरद पवारांनी कसबा निवडणुकीचे पुन्हा एकदा विश्लेषण करावे, असा सल्ला देत कसब्याचा विजय महाविकास आघाडीचा विजय नसून तो धंगेकरांचा आहे.

आम्हाला अपेक्षित मते मिळाली होती. मतांची जी वाढ झाली ती उमेदवाराची आहे. त्यांनी महाराष्ट्राची तयारी करावी, असे बावनकुळे म्हणाले.

चारही पक्षांनी एकत्र यावे, आम्ही ५१ टक्क्यांची तयारी करू. अडीच वर्षे मागच्या सरकारच्या काळात सत्तेचा दुरुपयोग झाला, त्यामुळे तालिबानी कोण हे सर्व जनतेला माहिती आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांच्या वक्तव्यावर त्यांनी दिले.

महाविकास आघाडीमधील जबाबदार आमदार कर्नाटक मध्ये जाऊन महाराष्ट्राची मने दुखवितात. अशा वेळी उद्धवजी एका मिनिटात प्रतिक्रिया देतात, अजूनही त्यांची प्रतिक्रिया आली नाही. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहोत.

आम्ही धीरज देशमुख यांच्या प्रतिक्रियेचा निषेध व्यक्त करीत असल्याचे सांगून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) झोपले आहेत का, असा सवाल बावनकुळेंनी केला. नाना पटोले (Nana Patole) यांनी होळीच्या दिवशी टीका टिपणी करू नये.

पंचमीला सांगू, त्यांचा पक्ष फुटतो आहे, तो थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. गोंदिया जिल्ह्यातील दहिवले हा कॉंग्रेसचा (Congress) मोठा नेता भाजपमध्ये आला. त्यामुळे कॉंग्रेस फुटत चालली आहे. त्यासाठी होळीला नमस्कार करून कॉंग्रेस फुटू नये, अशी प्रार्थना नानांनी करावी, असा सल्ला बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) दिला.

४००० हजार कोटी रुपये थांबविले होते. शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर हा निधी आता मिळाला असून सांगत नागपूर जिल्ह्याची डीपीसी ८०० कोटीची आहे.

यासोबतच एसटीपी, जीएसटी मिळून ११५० कोटी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळणार आहे. त्यातून नागपूरच्या विकासाला गती मिळणार असल्याचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT