Balu Dhanorkar, Piyush Goyal Sarkarnama
विदर्भ

चिनी वस्तूंवर बहिष्कार म्हणजे पोकळ वल्गना, पीयूष गोयल यांनीच केले स्पष्ट...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : स्वदेशी वस्तूंचा वापर करावा विदेशी वस्तूंचा वापर टाळा, अशी घोषणा भाजपने (BJP) केली होती. परंतु सत्तेत आल्यानंतर मोदी (Narenda Modi) सरकारला या घोषणेचा विसर पडलेला दिसून येत आहे, असे सांगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी लोकसभेत प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी भारताच्या (India) चीनसोबत व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपची घोषणा म्हणजे पोकळ वल्गना असल्याची टिका खासदार धानोरकर यांनी केली.

चीनसोबत आयात निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन म्हणजे पोकळ वल्गना आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे. लोकसभेत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रश्नाला चीनसोबत व्यापार वाढल्याचे केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्र्यांनी उत्तरात सांगितले. गेल्या सात वर्षात भारताची चीनसोबत आयात व निर्यात संबंधी वाढ झाली का किंवा घट झाली काय, असा प्रश्‍न खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत प्रश्न विचारला असता, केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी चीन कडून भारतात आयात करण्यात २०१४ - १५ ते २०२० - २१ पर्यंत वाढ झाल्याचे सांगितले. २०१४ - १५ मध्ये ६०. ४१ बिलियन अमेरिकी डॉलर वरून २०२०-२१ ला ६५. २१ बिलियन डॉलर झाल्याचे त्यांनी उत्तर दिले.

चीनमधून प्रामुख्याने आयात करण्यात येणाऱ्या वास्तूमध्ये वीज व दूरसंचार उपकरणे, कॉम्प्यूटर हार्डवेअर, खते, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोठ्या प्रकल्पांचे सामान, रसायने, औषधी इत्यादींचा समावेश आहे. या प्रमाणेच चीनला भारताकडून निर्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०१४ - १५ मध्ये ११.९३ बिलियन अमेरिकन डॉलर्स वरून २०२० - २१ मध्ये २१. ९ बिलियन अमेरिकन डॉलर झाली. निर्यातीत प्रामुख्याने पेट्रोलियम उत्पादने, इंजिनिअरिंग सामान कार्बनीक व अकार्बनीक रसायने, समुद्री उत्पादने, खनिजे इत्यादींचा समावेश आहे. या माहितीवरून मोदी सरकारचे धोरण विदेशी वस्तू वापर करणारे असल्याचे दिसून येत असल्याचे दिसून यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT