Maharashtra Politics:  Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Politics: सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्याचा प्लॅन; भाजप नेत्याचा दावा...

BJP- Mahavikas Aghadi Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री पदाच्या चर्चा रंगल्या आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री पदाच्या चर्चा रंगल्या आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. असे असतानाच पुढच्या वेळी महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन आहे, असा खळबळजनक खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.

नागपूरमध्ये आयोजित एका मेळाव्यात बोलताना बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. '' शिंदे गटातील आमदारांनी ५० खोके घेतल्याचे आरोप केले जात आहेत. पण पण हे आरोप खोटे आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील शिवसेनेचे आमदार किमान ५० वेळा भेटले असतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी कायम राहिले तर आम्ही ६५ चे १० झाल्याशिवाय राहणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिवसेना संपवण्याचा विडाच उचलला आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

बावनकुळे म्हणाले की, “पुढच्या वेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील, असा महाविकास आघाडीमध्ये ठरलं आहे.  २०२४मध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निश्चित केला होता. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे कमी आमदार निवडून आणायचे, असेही ठरले होते. ही गोष्ट समोर आल्यामुळे शिवसेनेतील आमदारांनी उठाव केला,' असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. '

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT