PM Narendra Modi at Yavatmal. Sarkarnama
विदर्भ

Modi's Yavatmal Tour : देशवासियांना दिलेली प्रत्येक ‘गॅरंटी’ मोदी पूर्ण करणार

Women's Public Meeting : ‘हात जोडन रामरमी..’मोदींची बंजारा भाषेतून नारीशक्तीला साद. ‘अबकी बार चारसौ पार’चा दिला नारा

सतीश हरिश्चंद्र येटरे

Modi's Yavatmal Tour : विदर्भाच्या भूमीत आल्यावर आपल्याला नेहमीच आनंद होतो. आपण जेव्हा जेव्हा यवतमाळला आलो, तेव्हा तेव्हा विदर्भातील जनतेने आपल्याला व भाजपला बहुमत प्रदान केले आहे. आता पुन्हा एकदा आपण यवतमाळच्या पावन भूमीवर आलो आहे. त्यामुळे यंदा विदर्भातील जनता यंदा ‘अबकी बार चारसौ’ पारचे स्वप्न नक्कीच साकार करेल असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यवतमाळ येथील भारी परिसरात आयोजित महिला बचत गटाच्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले. व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार भावना गवळी, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, भारताला विकसित करण्याचा संकल्प आपण केला आहे. हा संकल्प नारीशक्ती आणि युवाशक्तीच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. याशिवाय अनेक विकास प्रकल्पांचे त्यांनी उद्घाटन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर मोदींनी टीका केली. महाराष्ट्राचा नेता कृषिमंत्री असतानाही केवळ पॅकेज जाहीर व्हायचे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा होत नव्हता. परंतु आता एक क्लिकवर 21 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले. काँग्रेसच्या सरकारमध्ये एक रुपया दिल्लीतून निघायला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 15 पैसे पोहोचायचे असे मोदी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप सरकारच्या कार्यकाळात गरीबांचा पूर्ण पैसा त्यांना मिळत आहे. ही ‘मोदी गॅरंटी’ आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांजवळ ‘डबल इंजिन’ सरकार आहे असा उल्लेख करीत पंतप्रधान म्हणाले की, केंद्र आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी अव्याहतपणे काम करीत आहे. यवतमाळच्या शेतकऱ्यांचा आतापर्यंत 900 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. त्याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. विकसित भारतासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्त करण्यावर भर आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व विदर्भातील जनतेला चांगले ठाऊक आहे. पूर्वी गावांमध्ये पाण्यासाठी हाहा:कार असायचा. आता गावे सुजलाम-सुफलाम झाली आहेत. आता ‘हर घर नल’योजना सक्रिय झाली आहे. राज्यातील 1 कोटी 25 लाख घरांमध्ये नळाचे पाणी पोहोचले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

सिंचन प्रकल्प पूर्णत्वाकडे

महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्प रखडले होते. काही लोकांच्या पापांची ही शिक्षा नागरिक भोगत होते. मात्र राज्यातील 26 पैकी 12 योजना पूर्ण झाली आहे. उर्वरित योजनाही लवकरच पूर्ण होणार असल्याची ग्वाही पंतप्रधांनी दिली. गोसेखुर्द प्रकल्पाचे काम वेगाने मार्गी लागल्याची आठवण मोदींनी करून दिली. त्यातून विदर्भाच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. आपण गेल्या दहा वर्षांत जे संकल्प केले, ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे मोदी म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT