narendra modi  sarkarnama
विदर्भ

Narendra Modi News : काँग्रेसला गणेशोत्सवाची चीड आहे का? पीएम मोदींनी केली विचारणा

Rajesh Charpe

Nagpur News : महाराष्ट्रात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. देशाच्या मुख्य न्यायाधीशांच्या घरी गणेश पुजेला पंतप्रधान मोदी गेले होते. यावरून काँग्रेसने टीका केली होती. शुक्रवारी मोदी यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसला यावरून चांगलेच सुनावले. तुम्हाला गणेशोत्सवाची चीड आहे का? असा सवाल उपस्थित करून त्यांनी काँग्रेसमध्ये तृष्टीकरणाचे भूत जागृत झाले असल्याचा आरोप केला.

काँग्रेसला भारतीय आस्था व संस्कृतीचा सन्मान असता तर त्यांनी गणपती पूजेला विरोध केला नसता. टिळकांमुळे गणेशोत्सव भारतीय उत्सव आणि एकतेचा उत्सव झाला. आता देशभर गणेशोत्सव साजरा केला जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. (Narendra Modi News)

काँग्रेसने कर्नाटकमध्ये गणपतीच्या मूर्तीला पोलिस कोठडीत टाकले. त्यामुळे देशभर रोष निर्माण झाला आहे. आता काँग्रेसने केलेल्या पापाला उत्तर द्या आणि भारतीय संस्कृती, आस्थेसोबत उभे राहा, असे सांगून मोदी यांनी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला निवडून आणण्याचे आवाहन केले.

सर्वाधिक कापूस पिकवणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या विदर्भाची काँग्रेसने आजवर उपेक्षाच केली. कापूस उत्पादकाला ताकद देण्याऐवजी त्याला आणखीच कमजोर केले. शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर विदर्भाचे चित्र बदलायला सुरुवात झाली.

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर टेक्सटाईल पार्कची उभारणी करण्यात आली. यापूर्वी येथे एकाही उद्योग येत नव्हता. पीएम मित्र पार्क योजनेतून कापासापासून फायबर, फेब्रिक आणि फॅशनेबल कपड्यांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे कापसाला चांगले दाम मिळणार आहे.

विदर्भात सुमारे दहा हजार कोटींची गुंतवणूक होईल आणि एक लाख युवकांना रोजगाची संधी उपलब्ध होईल, असे मोदी यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात विदर्भातील सिंचन प्रकल्पांना त्यांनी ब्रेक लावले होते.

आम्ही त्या प्रकल्पांना गती दिली. 85 हजार कोटींच्या वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात 10 लाख एकर जमिनीवर सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. यातून विदर्भात समृद्धी येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT