Nana Patole, Dr. Parinay Fuke, Praful Patel and Sunil Mendhe Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : तिकिटासाठी इच्छुकांची वारी पक्षश्रेष्ठींच्या दारी !

अभिजीत घोरमारे

Bhandara-Gondia Constituency : लोकसभेसाठी अनेकांची तयारी सुरू झाली असून, आजी-माजी नेते कामाला लागले आहेत. तिकिटासाठी इच्छुकांची पक्षश्रेष्ठींच्या दारी वारी वाढली आहे. लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तिकीट मिळण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग लावणे सुरू आहे. त्या अनुषंगाने पक्षश्रेष्ठींच्या दारी इच्छुक उमेदवार चकरा मारीत असल्याचे बघायला मिळत आहे. यासंदर्भात आजी-माजी नेते जोमाने कामाला लागल्याचे चित्र भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत दिसत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. फेब्रुवारी संपताच कधीही आचारसंहिता जाहीर होऊ शकते, अशी एकंदरीत स्थिती निर्माण झाली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सर्वसाधारण असल्याने या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. सध्या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे खासदार सुनील मेंढे करीत आहेत. पक्ष ‘सेटिंग-गेटिंग’ हे सूत्र लावते की ‘नवा गडी, नवा राज’ हे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांची जोरदार मोर्चेबांधणीनेसुद्धा तरी हेच दिसत आहे.

सध्या महायुतीमुळे या मतदारसंघातील समीकरणावर परिणाम होणार आहे. महायुतीत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मतदारसंघावर दावा करू शकतो, अशी चर्चा होऊ लागली आहे. त्यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अद्याप मौन बाळगले असले तरी जिल्ह्यात त्यांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. महायुतीच्या बैठकीत जो निर्णय होईल तो अंतिम राहील, असे ते सांगत आहेत. काँग्रेसकडून सध्या प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले वगळता कुणाचेही नाव पुढे करण्यात आलेले नाही. येत्या आठ ते दहा दिवसांत हे सर्व स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसची ही इच्छुक दिल्लीवारी करताना बघायला मिळत आहे. त्यापूर्वीच इच्छुकांनी सभा, बैठका आणि मेळाव्यांचे सत्र सुरू केले आहे. त्यातून ते मोर्चेबांधणी करीत असल्याचे चित्र भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आहे. या सर्व घडामोडीत जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत कार्यक्रम, मेळावे, भूमिपूजनाचा सपाटाच लावला आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने कार्यक्रम घेण्याबाबत विद्यमान भाजप खासदार सुनील मेंढे सर्वांत पुढे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मंत्री डॉ. परिणय फुके हेदेखील या पंगतीत सामील झाले आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT