NCP internal rift : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तींवर पक्षाचेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी शंका व्यक्त केली. जे कधी गावात दिसत नाहीत, पक्षाचं काम करीत नाही, ज्याचे कुठेच अस्तित्व नसते असे लोक मी या कमिटीवर आलो असे सांगतात. पक्षाचे अधिकृत नियुक्ती पत्र घेऊन मिरवतात. त्यांना नियुक्तीपत्र कसे मिळते, कोण देतं, बाकी काय झक मारतात काय? असा खडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अलीकडेच पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बदल करण्यत आले आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरांना पुन्हा सामावून घेण्यात आले आहे. याचा रोष त्यांनी व्यक्त केल्याची चर्चा राष्ट्रवादीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या समारोपात पटेल यांनी संताप व्यक्त केला आहे.
पटेल म्हणाले, मुंबईत मंत्र्यांकडे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. मात्र त्यांच्या गावात आणि वॉर्डात काहीच अस्तित्व नसते. काही नुसते फोटो काढायला येतात. पक्षाचे नियुक्तीपत्र थेट मुंबईतून घेऊन येतात. अशा लोकांमुळे पक्षाचे नुकसान होते. प्रामाणिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते.
छोट्या छोट्या गावांमध्ये शेकडो कार्यकर्ते प्रामाणिकपणे पक्षाचे काम करीत असता. त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे यापुढे नियुक्त्या करताना पडताळणी करा. त्याची माहिती घ्या. त्या त्या जिल्ह्यातील नेत्यांना विचारा, विश्वासात घ्या, असे मी मंत्र्यांना सांगू इच्छितो, असेही पटेल म्हणाले.
चार महिने मंडळांचे वाटप शक्य नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येत्या मंगळवारी महामंडळ वाटपाची बैठक बोलावली आली आहे. लवकरच कार्यकर्त्यांना मंडळे वाटप केली जातील, असे सांगितले होते. मात्र पटेल यांनी मला तसे वाटत नाही, असेही स्पष्टपणे सांगितले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका आहेत. चार महिने त्यातच जाणार आहे. त्यामुळे किमान चार महिने तरी मंडळांचे वाटप होईल, असे मला वाटत नसल्याचे ते म्हणाले.
नागपूरमध्ये मंथन शिबिर घेतल्याने सातत्याने आम्हाला विचारणा केली जात आहे. या शहराची निवड का केली, यामागचा हेतू काय, काही राजकीय अजेंडा आहे का असे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. माझा त्यांना सवाल आहे, नागपूर महाराष्ट्रात येत नाही का, राज्याचा भाग नाही का. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असल्याचे तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पश्चिम महाराष्ट्रवादी आहे, अशी टीका केली जाते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सहाजण निवडून आले आहेत, असे सांगून तटकरे यांनी विदर्भच नव्हे तर पक्षाला मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांमध्ये लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.