Sharad Pawar, Praful Patel News Sarkarnama
विदर्भ

Praful Patel News : शरद पवारांसोबतच्या फोटोवर अखेर पटेलांचा खुलासा : म्हणाले...

अभिजीत घोरमारे

Bhandara News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा नव्या संसद भवनातील भेटीचा फोटो खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोबद्दल शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केल्याची तसेच पटेलांना जाब विचारल्याची चर्चा रंगली होती. या भेटी दरम्यान, काय घडले याबाबत पटेल यांनीच स्वत: खुलासा केला आहे.

नव्या संसद भवनातील पहिल्या दिवशी राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट झाली होती. नव्या संसद भवनातील शरद पवारांची झालेली ती भेट राजकीय नव्हती. ती भेट योगायोगाने झाली होती. शरद पवार आमचे वंदणीय असल्यामुळे त्यांच्यासोबत फोटो काढले. तो फोटो व्हायरल झाला. मात्र, त्या मुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये. तर पवारसाहेब शेवटपर्यंत आमचे आदरणीयच राहतील असा खुलासा त्यांनी गोंदियात केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडली. त्यात प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना साथ दिली.

शरद पवार यांनी गुजरात दौऱ्यावर असताना प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. महत्त्वाची पद देऊन देखील अजित पवार गटांमध्ये गेले असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर पटेल म्हणाले 'त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या, मी जिथे होतो तिथे प्रामाणिकपणे कार्य केले. मी प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच त्यांचा उजवा हात लोक मला समजत होते. आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. आमची इच्छा होती की साहेबांनी आमच्या भूमिकेला स्वीकारावे पण ती त्यांची मर्जी ! त्याच्यावर काही भाष्य करणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हेच आहेत. जसे शरद पवार होते तसेच अजित पवार हे आहेत. आम्ही पक्ष एकच समजतो, आमचा आणि त्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत असेही पटेल म्हणाले. आता मुख्यमंत्रीपद खाली नाही आहे. मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो नाही, तर मोदी सरकारवर विश्वास ठेवून राज्य सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरुण शिंदे आणि अजितदादामध्ये भांडण लावण्याच काम कोणीतरी करीत आहे. असा आरोप त्यांनी केला.

मराठा राजकारणावरून सरकारचा फुटबॉल कुणी करू नये

आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने असून यात दुमत नाही. मात्र, मराठा समाजाच्या राजकारणावरून सरकारचा फुटबॉल कुणी करू नये. कोणाच्याही सरकारमध्ये मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या मुंबईच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलावले होते. सरकार त्यावर तोडगा काढण्यासाठी काम करत असल्याचे पटेलांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT