Prafull Patel and Nana Patole
Prafull Patel and Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Prafull Patel : यांनी काढले नाना पटोलेंचे ‘स्टॅंडर्ड’, महाविकास आघाडीत काय चाललंय?

Abhijit Ghormare_Guest

Nana Patole and Prafull Patel News : काल दिवसभर सुरू असलेल्या शिवसेनेच्या चिन्हाबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर दुसरीकडे गोंदियात महाविकास आघाडीचे नेते एकमेकांची फिरकी घेताना दिसत आहे. दरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्टॅंडर्ड नाहीत, मी फक्त स्टॅंडर्ड लोकांवर बोलतो, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेलांनी नाना पटोले यांना लगावला.

प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली आहे. भंडारा-गोंदियातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) वजनदार नेते व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची भाजपसोबत (BJP) मैत्री असल्याच्या गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला होता.

माध्यमांनी प्रफुल्ल पटेलांना विचारणा केली असता, प्रफुल्ल पटेल म्हणाले, नाना पटोले स्टॅंडर्ड नाहीत, मी ‘स्टॅंडर्ड’ लोकांवर बोलतो, असे म्हणत त्यांनी नाना पटोले यांना सुनावले आहे. प्रफुल्ल पटेलांच्या या वक्तव्याने पुन्हा एक नवीन राजकीय वादाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आता नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील वाद पुन्हा चव्हाटयावर आला आहे.

पटोले आणि पटेल यांच्यातील वादामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीत पुन्हा धुसफुस निर्माण झाली आहे. यावर नाना पटोलेंकडून काय प्रतिक्रिया येते, याची प्रतीक्षा भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे. ३ जानेवारीला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील तानुटोला येथे बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना नाना पटोलेंनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भाजपसोबत मैत्री असल्याचे वक्तव्य केले होते.

शिंदे सरकारने हेक्टरी १५ हजार रुपये धानाला बोनस जाहीर केला आहे. मात्र हा बोनस शेतकरी विरोधी असून, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु, असे राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात म्हटले आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता प्रफुल्ल पटेल हे गोंदियात कसे आंदोलन करणार, असा प्रश्‍न करीत ‘त्यांची तर भाजपसोबत मैत्री आहे’, असे खोचक वक्तव्य केले होते. प्रफुल्ल पटेल कसे काय आंदोलन करणार, असेही नाना पटोले यांनी म्हटले होते. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादाला सुरुवात झाली. तो वाद मिटत नाही तोच प्रफुल्ल पटेलांनी नाना पटोलेंचे स्टॅंडर्ड काढले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आगीत तेल टाकण्याचे काम केले आहे.

आधीच पदवीधर शिक्षक मतदार संघात उमेदवार देताना महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाटयावर आले. महाविकास आघाडी दोन नेते आपसात भांडताना दिसत आहेत. एकीकडे भाजपने पदवीधर मतदार संघासह लोकसभेचे रणशिंग फुंकले आणि कामालाही सुरुवात केली. दुसरीकडे महाविकास आघाडी नेते एकमेकांची फिरकी घेण्यास व्यस्त असल्याचे दिसत आहे. नेत्यांमधील भानगडी महाविकास आघाडीला अडचणीच्या ठरणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT