Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

VBA political alliance : आंबेडकर कोणा कोणाला हवेत? प्रकाशरावांनी यादीच सांगितली, महापालिकेत 'वंचित'चा वाढलाय भाव!

Prakash Ambedkar on Vanchit Bahujan Aaghadi Alliance in Municipal Elections : राज्यातील महापालिका निवडणुकीत कोणा-कोणासोबत वंचितची आघाडी होणार यावर प्रकाश आंबेडकरांनी मिश्किल टोलेबाजी केली.

Pradeep Pendhare

Maharashtra municipal elections : राज्यातील महानगरांची सत्ताशर्यत आजपासून सुरू झाली आहे. राज्यात आम आदमी पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाने स्वबळाचा नारा दिलेला नाही. आघाड्या अन् युतीच्या चर्चांनी वेग घेतला, असून प्रत्येकजण आपापला भाव वाढवत आहेत. यात सर्वाधिक चर्चा प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीची आहे.

वंचितकडे आघाड्या अन् युतीसाठी कोण कोण येत आहे, यावर प्रतिक्रिया देताना, प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल टिप्पणी केली. "नवरदेव तयार आहे. मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. नुसतं चहापाण्याच्या चर्चा आहेत. मुलगी पसंद आल्यानंतर लगीन लावू," काँग्रेस आणि इतर पक्षांसोबतच्या आघाडीवर प्रकाश आंबेडकरांनी विधान केलं आहे.

राज्यात प्रकाश आंबेडकर नेमकं कुणासोबत जाणार यावर सध्या मोठा सस्पेन्स आहे. एकीकडे मुंबई आणि नागपुरात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) काँग्रेसशी आघाडी करणार असल्याच्या चर्चा आहे. तर आंबेडकरांनी राज्यात 12 ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेना आणि 10 ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीची चर्चा सुरू आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.

अकोल्यात (Akola) प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली. यात वंचित राज्यात करत असलेल्या आघाड्या आणि युतीवर, एक सूचक आणि महत्वाचं विधान केलं. नवरदेव तयार आहे. मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. नुसतं चहापाण्याच्या चर्चा आहेत. मुलगी पसंद आल्यानंतर लगीन लावू, असं म्हणत आंबेडकरांनी अद्याप कुणाशीही युती-आघाडी झाली आहे, असे स्पष्ट केलं नाही.

काँग्रेसबरोबर फक्त चर्चा, जागा वाटप ठरलं नाही

दरम्यान, 'आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही, असं ते म्हणालेत. तर मुंबईचं सांगता येत नाही. कारण, आघाडी जाहीर करा म्हणलं, तर थांबा म्हणतात. आज काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र जात नाही. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, कुणासोबत जायचं. काँग्रेससोबत मुंबईत अद्याप जागा वाटपावर बोलणी सुरू झालेली नाही. मात्र, 50 टक्के जागा वाटपांवर आम्ही ठाम आहोत,' असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

मुंबईत 200 जागांवर वंचितची तयारी

वंचित बहुजन आघाडी, म्हणजेच आम्ही नगरपालिकेत काय आहोत, ते सर्वांना दिसलोय. दुसरीकडे आम्ही मुंबईत 200 जागांवर आमची तयारी आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी ठाम सांगितलं. आमचा आग्रह 50-50 टक्के जागांचा असल्याचं ते म्हणाले.

अजितदादांनी 350 कोटींचा निधी पळवला

दरम्यान, अकोल्यातील भूमिगत गटार योजनेच्या फेल्युअरला माजी खासदार संजय धोत्रे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ही योजना नको म्हणून संजय धोत्रेंनी केंद्राला पत्र लिहिलं होतं. त्यावेळी महापालिकेला आलेला 350 कोटींचा निधी अजित पवारांनी बारामतीला पळवला. त्यावेळी अजित पवारांनी मला फोन करून सांगितलं की, बारामतीकडं पैसे वळवले, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वडेट्टीवारांनी वंचितसोबतच्या आघाडी सांगितली

दरम्यान, वंचितसोबत राज्यात अनेक ठिकाणी आघाडी करण्याचा विचार असल्याची माहिती काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी दिली. मुंबईत बोलणी सुरू असून, चंद्रपूर, नागपूर, अकोला अशा अनेक महापालिकेत एकत्र लढण्याचे नियोजन आहे. तसेच पुणे महापालिकेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आल्यास महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस सोबत राहील, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT