Loksabha Election 2024 : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकारिणीने घेतलेल्या ठरावाची माहिती आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत दिली. यात वंचितचा माइंड गेम समोर आला. काँग्रेस पक्षाने न मागता वंचितने महाराष्ट्रातील सात जागांवर बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे वंचित आणि काँग्रेसमध्ये असलेले भांडण कुठे तरी संपल्याचे आणि वंचित आणि काँग्रेस हे एकत्र भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्धार आजच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाला आहे. हा ठराव वंचितने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविला आहे.
हे करताना वंचितने महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात वंचितचे उमेदवार उभे राहू शकतात, असाच काय तो संदेश आज दिला आहे. हा सर्व प्रकार सामान्य मतदारांना समजणे कठीण जरी असला तरी, वंचितची ही खेळी भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागू शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतविभाजनाचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसला होता. तेव्हा काँग्रेसला केवळ एका जागेवर महाराष्ट्रात समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र वंचितच्या आजच्या प्रस्तावाने काँग्रेसला सात जागांवर किमान मत विभाजन टाळता येईल. त्याचा फायदा हा निश्चित काँग्रेसला होणार असून, याचा मोठा फटका हा महायुतीच्या उमेदवारांना बसण्याची भीती आहे. वंचित कार्यकारिणीच्या ठरावामुळे नेमके सात मतदारसंघ कोणते हे आता काँग्रेसला निश्चित करावे लागेल. काँग्रेस एका हाताने सात जागांवर जर वंचितचा पाठिंबा घेणार असेल तर दुसऱ्या हाताने काँग्रेस वंचितला पाच ते सात जागांवर पाठिंबा देऊ शकते. अशा वेळी वंचितची महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्राप्त होणारी संख्या येथे सहज पदरात पडणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईत राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागानंतर वंचितने काँग्रेसबरोबर जुळवून घेण्याचे धोरण आखल्याचे चित्र आहे. याचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील लोकसभा जागांवर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये 15 जागांवर तिढा असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पाच जागांवर तिढा असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. त्यामुळे महाविकास आघाडीत एकमत नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
भाजप कार्यकर्त्यांनी ठरवावे उपऱ्यांना निवडायचे का
भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या इन्कमिंगवर वंचित नेते प्रकाश आबेडकर यांनी भाजप कार्यकर्त्यांची परवड होत असल्याचे सांगितले. भाजपमध्ये उपऱ्यांना तिकीट दिले जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी ठरवावे की, ते उपऱ्यांचे काम करणार आहेत की नाही, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. या वेळी त्यांनी जे भाजप सोबत होते त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असे म्हणत थेट शिवसेना खा. संजय राऊत यांच्यावर सांगलीच्या जागेवरून जोरदार आगपाखड केली आहे.
नेमके काय म्हणाले आंबेडकर
मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना आम्ही काही तासांपूर्वी पत्र लिहिलं. आमच्यात पत्रांमध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत. त्या पत्रकार परिषदेतून आंबेडकर यांनी मांडल्या. महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत दहा जागेच्या वरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे. पाच जागांवर शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला ज्या सात जागा येतील, त्या सात जागांवर वंचितची साथ असेल, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आघाडी त्यासंदर्भात आमचं काही भाष्य नाही, अशी पुष्टीदेखील आंबेडकर यांनी जोडली. आंबेडकर यांनी थेट काँग्रेसला काही जागांवर साथ देण्याची घोषणा करत राजकीय सारीपाटावर अजून एक नवी अफलातून चाल खेळली असून, यात महायुतीचा गेम करण्याची व्यूहरचना आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर पहिली चाल मानली जात आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.