Prakash Ambedkar and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

फडणवीसांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली...

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे राजकारण म्हणजे XXचे राजकारण असल्याचे आंबेडकर (Prakas Ambedkar) म्हणाले. यानंतर आता नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जयेश गावंडे

अकोला : फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस दिली. त्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण म्हणजे XXचे राजकारण असल्याचे आंबेडकर म्हणाले. यानंतर आता नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंबेडकर (Prakas Ambedkar) म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना मैदानी दिलेर समजत होतो. परंतु त्यांचा दिलेरपणाही दिसला नाही आणि मैदानीपणा पण दिसला नाही. त्यांनी जी टेप स्पिकरला दिली, सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे असेल तर XXचे राजकारण केले, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे. दिलेरपणाचे राजकारण जर करायचे असेल तर त्यांनी ती टीप लोकांसमोर जाहीर केली पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले. फडणवीस यांनी ती टेप लोकांसमोर दिली असती तर पोलिसांनी नोटीस दिली नसती. पोलिसांनी दाबण्यासाठी नोटिस दिल्याचेही आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांनी कॉंग्रेसच्या आत्मचिंतन बैठकीवर बोलणे टाळले.

मी जे बोललो, ती आज सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. या प्रकरणात त्यांनी दिलेरपणाने राजकारण करणे अपेक्षित होते. पण त्यांनी तसे केलेले नाही. कॉंग्रेसच्या आत्मचिंतन बैठकीबाबत विचारले असता, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे. मी त्यांच्या पक्षाचा सभासद नाही. त्यामुळे त्यांच्या बैठकीबाबत बोलण्याचा मला अधिकारही नाही आणि बोलणारही नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लुटला क्रिकेटचा आनंद..

भारतामध्ये अनेकांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. लहान-थोरांपासून राजकारणी, सेलिब्रिटी आणि व्यावसायिकही अनेकदा क्रिकेट खेळताना पाहिले जातात. अनेक राजकीय नेते क्रिकेटच्या (Cricket) मैदानावरही दिसले आहेत. आज अकोल्यात (Akola) प्रकाश आंबेडकरांनी क्रिकेटचा आनंद लुटला. राजकारणाच्या खेळात फटकेबाजी करणारे आंबेडकर यांनीही आज क्रिकेटच्या ग्राउंडवर फटकेबाजी केलीय. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना दाद दिलीय. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रिकेट खुले सामन्यांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. चेंडू टोलवून त्यांनी आज या स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत अंजली आंबेडकर यांनाही खेळाचा मोह आवरला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT