Vijay Vadettivar, Pratibha Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : ब्रम्हपुरीतून पुन्हा वडेट्टीवारच! प्रतिभा धानोरकरांचा विरोध मावळला?

brahmapuri Assembly constituency : चंद्रपूरमधील वाद लक्षात घेतला ब्रम्हपुरी मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या भरपूर राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

Rajesh Charpe

चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील ‘समाजवाद' चांगलाच रंगला होता. याची गंभीर दखल काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी घेतली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी यावर भाष्य करणे आता बंद केले आहे. तरीही आतून धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

एरवी सर्वांनाच 'हेडऑन' घेणारे वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या एकाही इच्छुकाने अद्याप दावा केलेला नाही. हे बघता येथून एकच नाव समोर पाठवले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांच्या जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून काँग्रेसने नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांची नियुक्ती केली आहे. त्यांना एक आठवड्यात सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सांगण्यात आले आहे. सर्व इच्छुक उमेदवारांची यादीत त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी फक्त पाचच विधानसभेतील इच्छुकांच्या त्यांना मुलाखती घ्याव्या लागणार आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे अभिजीत वंजारी यांचे काम सोपे झाले आहे.

ब्रम्हपुरी येथे झालेल्या कुणबी समाजाच्या मेळाव्यात खासदार प्रतिभा धानोरकर ( Pratibha Dhanorkar ) यांनी अल्पसंख्याक आपल्यावर राज्य करीत असल्याचे सांगून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत 'परिवर्तन' करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार असून 'परिवर्तन' त्यांनाच लागू होत असल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.

यापूर्वीसुद्धा खासदार झाल्यानंतर धानोरकर यांनी आपण तिकीट वाटप करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर नाना पटोले यांनी खासदाराला तिकीट वाटपाचे अधिकार नसतात असे सांगून त्यांना गप्प केले होते. चंद्रपूरमधील वाद लक्षात घेतला ब्रम्हपुरी मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या भरपूर राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागितले होते. ही प्रक्रिया पार पडली आहे. यादरम्यान ब्रम्हपुरीतून काँग्रेसच्या एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निरीक्षक अभिजीत वंजारी यांचे या मतदारसंघातील काम हलके झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT