Shame that no woman gets a chance in the cabinet : महाराष्ट्राला राजमाता जिजाऊंचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शिवबांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्याकडून प्रेरणा घेऊन हजारो, लाखोंच्या संख्येने या राज्यातील महिलांना आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्व करण्याचे बळ मिळाले. पण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला संधी न मिळणे, ही बाब लाजिरवाणी आहे. असे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
जागतिक महिला दिनी सभागृहात बोलताना आमदार धानोरकर म्हणाल्या, या राज्यातील तमाम थोर महिलांचे स्मरण करून राज्य सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यामध्ये महिलांना योग्य संधी द्यावी. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा संपूर्ण जगातीलच सर्व महिलांना जगण्याचे साधे-साधे हक्क नाकारण्यात येत होते. अशा वेळी १९०७-०८ दरम्यान कामगार क्षेत्रातील महिला असो किंवा सामाजिक क्षेत्रातील महिलांनी आपल्या हक्कासाठी, विशेष करून मतदानाच्या हक्कासाठी लढा उभारला.
मुक्ताबाईच्या ओवी, बहिणाबाईच्या कविता, अहिल्याबाईं, ताराराणी, महारानी हिराई या विरांगणाचे शौर्य, सावित्रीमाई फुले आणि रमाबाई आंबेडकरांचा त्याग, अशा थोर स्त्रियांनी महाराष्ट्राच्या भूमीला कर्तृत्व संपन्न केले आहे. सभागृहाने महिलांना उन्नतीची द्वारे खुली करणारे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. या सभागृहाने तयार केलेल्या धोरणांनी या देशालासुद्धा दिशा देण्याचे काम आहे, असे आमदार धानोरकर (Pratibha Dhanorkar) म्हणाल्या.
स्वातंत्र्यापासून या देशातील, या राज्यातील महिलांनी प्रगतीची मोठी झेप घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी संविधानात तरतूद केलेल्या हिंदू कोड बिलमुळे स्वातंत्र्योत्तर काळात महिलांना संधीची कवाडे खुली झाली. महाराष्ट्र (Maharashtra) राज्याने या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पण, आजही आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत आहेत. ज्यामुळे महिलांना खरच समाज आणि विशेष करून पुरुष सन्मानाच्या आणि समानतेच्या नजरेने बघतात का, हे सुद्दा तपासले पाहिजे, असे आमदार प्रतीभा धानोरकर म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.