PHD on Sudhir Mungantiwar : राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा आवाका मोठा आहे. बरेच विद्यार्थी त्यांच्या कार्याचा अभ्यास करतात. पण चंद्रपूर जिल्ह्याच्या तळोधी बाळापूर येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी व राज्यशास्त्र विषयात अध्यापन करणारे दैवत बोरकर यांनी मंत्री मुनगंटीवर यांच्या कार्यावर शोधप्रबंध सादर केला आणि त्यांना पीएचडी मिळाली. आगामी काळात होणाऱ्या दीक्षांत समारंभ दैवत बोरकर यांना पीएचडी प्रदान केली जाणार आहे.
राज्याच्या एका टोकावर वसलेल्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात वास्तव्य असलेलं, पण आपल्या आगळ्या कार्यशैलीने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशपातळीवरही व्यक्तिमत्त्वाची छाप उमटविणारे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या याच्यावर पीएचडीसाठी प्रबंध लिहिण्याची कल्पना दैवत बोरकर यांच्या मनात आली. दैवत बोरकर यांचे वडील रघुनाथ बोरकर यांनीही त्यांच्या उमेदीच्या काळात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पुरातत्त्वासंदर्भात अभ्यास करून पीएचडीसाठी (PHD) प्रबंध सादर करून पीएचडी मिळवली होती. आता दैवत यांनी याच जिल्ह्यातील एका राजकीय नेतृत्वाच्या अनोख्या आणि म्हणूनच लोकप्रिय ठरलेल्या कार्यशैलीचा विषय आपल्या अध्ययनासाठी निवडला.
सुमारे सहा वर्षांपूर्वी पीएचडीसाठी गोंडवाना विद्यापीठात रजीस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांनी या विषयावर प्रत्यक्ष अभ्यास सुरू केला. होणाऱ्या प्रत्येक भेटीतून सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी कंगोरे उलगडत गेले तर दुसरीकडे विधिमंडळात त्यांनी मांडलेले प्रश्न, सामाजिक विषय, आशयघन अशी अशासकीय विधेयके, त्यांनी केलेला संसदीय आयुधांचा सुयोग्य वापर. या साऱ्याच बाबींचा त्यांनी अभ्यास केला. त्याची नोंद दैवत बोरकर यांनी या प्रबंधातून विस्तृतपणे मांडली आहे. राजकारणात वावर असलेल्या एका उच्चशिक्षित राजकीय नेत्याचा राजकारणापलीकडच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील व्यासंगावर, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उभारलेले ग्रंथालय आणि अभ्यासिकेवर, प्रकाश टाकतानाच बोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचे पैलूही उद्धृत केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.