Prithviraj Chavan Sarkarnama
विदर्भ

Prithviraj Chavan : मराठा समाजाला दिल्लीचे आरक्षण द्यायचे की राज्याचे ....

Anand Surwase

Nagpur News : मराठा आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठराविक वेळेमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. पंरतु हे आरक्षण देत असताना आपल्याला अनेक बारकावे पाहावे लागणार आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र काहींचा ओबीसी आणि कुणबी म्हणून आरक्षण देण्यास विरोध आहे. मात्र समाजाला दिल्लीचे आरक्षण मिळवायचे आहे, की राज्याचे आरक्षण याबाबत सरकारने बारकाव्याने विचार करावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आयोजित चर्चेमध्ये पृथ्वीराज चव्हाण बोलत होते, ते म्हणाले, आमच्या सरकारने 2018 मध्ये जे 16% आरक्षण दिले होते. ते राज्यापुरते मर्यादित होते. म्हणजे ते आरक्षण एमपीएससीसाठी लागू होत होते. मात्र जर मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण दिले तर समाजातील तरुणाना त्याचा केंद्रीय स्तरावली परीक्षासाठी देखील फायदा होणार आहे. कारण कुणबी आरक्षणाची नोंद ही सेट्रेल स्तरावरील आरक्षणात देखील आहे. त्यामुळे समाजाला दिल्लीचे आरक्षण मिळेल. सरकारने या देखील मुद्द्यांचा विचार करून समाजाशी आणि तज्ञांशी चर्चा करावी असे मत चव्हाण यांनी सभागृहात व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, कुणबी म्हणून आरक्षण घेण्यास समाजातील काही घटकांचा विरोध आहे. जसे कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र स्वीकारल्यास मराठा हे अस्तित्व राहणार नाही, असा काहींचा समज आहे. मात्र, जर समाजाला कुणबी म्हणून आरक्षण प्राप्त झाल्यास त्याचा युपीएससीसाठी देखील उपयोग होणार आहे. त्यामुळे सरकारने याबाबींचा देखील आरक्षण देताना विचार करावा की आपल्याला दिल्लीतील आरक्षण पाहिजे की राज्याचे आरक्षण पाहिजे याचा विचार करणे गरजे आहे. असे ठाम मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. दरम्यान, आम्ही आमच्या सत्ता काळात मुस्लीम समाजालाही 5 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण आम्ही धर्माच्या आधारावर नाही तर ते जातींच्या आधारावर दिले होते, त्यामुळे कृपा करून आरक्षणाच्या या मुद्द्याला धार्मिक रंग देऊ नये असेही मत व्यक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार नितेश राणेंवर निशाणा साधला. धनगर आरक्षणावर बोलताना चव्हाण म्हणाले, की मराठा आरक्षणा प्रमाणे धनगर आरक्षणाचा ही प्रश्न प्रलंबित आहे. 2014 मध्ये फडणवीस यांनी सत्तेत येताच 15 दिवसात आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्याचे पुढे काय झाले? तसेच धनगर समाजातील एक दोन नेत्यांना आमदारकी दिल्याने प्रश्न मिटतो का? का केवळ मते मिळवण्यासाठीच धनगर समाजाला आश्वासन दिले होते असा सवालही चव्हाण यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT