शेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो यात्रा' सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा (Bharat Jodo Yatra) ७ सप्टेंबरला कन्याकुमारी येथून निघाली होती. केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र असा प्रवास करत ही यात्रा बुलढाण्यातील शेगावपर्यंत पोहोचली आहे.
आज त्यांची यात्रा बुलढाण्यातील शेगाव येथे पोचली असून संत येथे जाहीर सभा होत आहे. या सभेत बोलतांना राहुल गांधी म्हणाले, भीती आणि हिंसा पसरवण्याच काम देशातील सरकार करत आहे. या विरोधात ही आमची यात्रा आहे. यात्रेच लक्ष आपलं दुख समजून घेण्याच आहे. लोंकाशी भेटल्यावर लोकांना समजते. द्वेषाने देशाचे नुकसान होते. विरोधी लोक म्हणतात भीती कशाची तर त्यांना सांगतो. की, गेल्या सहा महिन्यात किती आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांचं दु:ख सरकारला समजत नाही. यामुळे लोकांना जोडण्यासाठी आमची ही यात्रा आहे.
दरम्यान, राहुल यांच्या सभेमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. मात्र वेळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे सभा ही सुरळीत पार पडत आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषाणाच्या सुरूवातीला 'संत गजानन महाराज की जय', अशी घोषणा देत सुरूवात केली तेव्हा जमलेल्या समुदायांनी जोरदार प्रतिसाद दिला. राहुल गांधी आपल्या यात्रेचा उद्देश सांगत शेतकरी, कामगार, बेरोजगार तरूण, आणि देशातील विविध प्रश्नावर आपलं मत व्यक्त करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.