Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

Raj Thackeray : मनसे प्रमुखांनी सांगितला सत्तेत जाण्याचा 'राज'मार्ग...!

Rajesh Charpe

Nagpur : माजी पंतप्रधान अटलबिरी बाजपेयी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याही भाषणाला प्रचंड गर्दी होत होती. त्यांना ऐकायला महाराष्ट्र लोटत होता. मात्र भाजप आणि शिवसेनेची (Shivsena) सत्ता यायला सुमारे चाळीस ते पन्नास वर्षे वाट बघावी लागली. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्याकरिता वेळही द्यावा लागतो. एक दिवस महाराष्ट्राची जनता आपल्याही हातात सत्ता देईन असा विश्वास मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केला.

तुमच्या सभांना गर्दी होते. टाळ्या आणि शिट्ट्या पडतात. सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासूनह हे चित्र आहे. मात्र मनसेच (MNS) उमेदवार निवडून येत नाही. सभांमधील गर्दीतील निम्मे मतेही मनसेच्या उमेदवाराला पडत नाही. या प्रश्नावर आज राज ठाकरे यांनी आज मोकळेपणाने भाष्य केले. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे.

हजारो स्वयंसेवक नागपूरसह देशभरात काम करतात. मात्र भाजपची सत्ता यायला पन्नास वर्षे तब्बल वाट बघावी लागली. आम्ही आमचे विचार आणि बाजू प्रामाणिकपणे मांडतो. लोकांनाही ते आवडते. ज्या मतदारांनी भाजप (BJP) वा बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती सत्ता दिली एक दिवस मनसेलाही देईल असेही त्यांनी सांगितले. मनसेचे किती उमेदवार निवडून येणार, तुमचा अंदाज काय या प्रश्नावर त्यांनी परीक्षेच्या आधीच पेपर फोडणार नाही असे सांगून उत्तर देण्यास टाळले.

माझे सुधारायचे वय गेले...

तुम्ही थेट आणि रोखठोक बोलता. राजकीय भूमिका मांडता. राजकीय परिणामांची चिंता करीत नाही. त्यामुळे वाद होतो. पक्षाचे नुकसानही होते. राजकारणात बोलताना सावध असावे लागते. बेरजेचे गणित करावे लागते. काही विषयांवर गप्प राहावे लागते. निवडणुकीच्या वेळी सोयीची भूमिका घ्यावी लागते या प्रश्नावर राज ठाकरे यांनी आता माझे सुधारायचे आणि बिघडायचेही वय राहील नाही असे मजेशिर उत्तर दिले. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच हंशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT