mns Chief Raj Thackeray on Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Raj Thackeray : 'शरद पवारांमुळेच राज्यात राजकीय चिखल...', राज ठाकरेंनी डागली तोफ

Rajesh Charpe

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली. आज जो काही राज्यात राजकीय चिखल झाला आहे, त्याला शरद पवार हेच जबाबादार असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

विधानसभेच्या निवडणुकीच्या चाचापणीसाठी राज ठाकरे तीन दिवसांपासून विदर्भात आहेत. आज त्यांनी नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि इच्छुकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबतही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पुलोदची स्थापना झाली तेव्हापासूनच राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेचा (NCP) जन्मसुद्धा फोडाफोडीतूनच झाला. जातीपातीचे विषही त्यांनीच कालावले. आता हाच कित्ता सर्वच राजकीय पक्ष गिरवीत आहे. जे नाणे चालते त्याचे राजकारण केले जाते असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी मोदी-शाह आणि भाजपच्या विरोधात मतदान केले होते. ती वाफ आता निघून गेली आहे. संविधान बदलणारच्या भीतीने दलितांनी आणि मुस्लिमांनी भाजपच्या (BJP) विरोधात मतदान केले होते. महाविकास आघाडी आणि महायुतीचे गलिच्छ राजकरण सर्वांनीच बघितले. ही परिस्थिती मनसेसाठी पोषक आहे. आम्ही सुमारे सव्वा दोनशे जागा विधासभेत लढणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विरोधात आम्ही उमेदवार उभे करणार असल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट आहे. ती यापूर्वीसुद्धा आपण जाहीर केली असल्याचे सांगितले.

अत्याचाराला युती व आघाडी जबाबदार

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची आकडेवारी यावेळी नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालावर सादर केली. 2017 ते 2023 या दरम्यान घडलेले गुन्हे व नोंदी त्यांनी सांगितल्या. या दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीचे सरकार होते. कडक कायदे आणि शासन नसल्यामुळे या घटना घडत आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीला यावर बोलण्याचा अधिकार नाही. सध्या रोज प्रसिद्ध होणारी आकडेवारी बघता याचा वापर निवडणूक व राजकारणासाठी केला जात असल्याची शंकाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT