Amol MItkari, Devendra Fadanvis and Raj Thackeray
Amol MItkari, Devendra Fadanvis and Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

राज ठाकरेंनी चितळेला झापले, हे बरे झाले; पण फडणवीसांमुळे ‘हा’ स्तर पार खालावला…

जयेश गावंडे

अकोला : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केतकी चितळेने खालच्या स्तरावर पोस्ट केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांना विचारले असता त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कौतुक करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार मिटकरी (MLA Amol Mitkari) म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जेव्हापासून विरोधी पक्षनेते झाले, तेव्हापासून हा स्तर जास्तच खालावलेला दिसतोय. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण कोण्या दिशेने चाललंय, असा प्रश्न विचारत अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. आमदार मिटकरी यांना केतकी चितळे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी विचारले असता मिटकरी बोलत होते. दरम्यान मिटकरी म्हणाले या प्रकरणी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केतकी चितळे हिला झापले असेल तर हे समर्थनीय आहे. मात्र देवेंद्र फडणवीस सारखे मुत्सद्दी नेते यावर बोलायला तयार नसतील तर ही गंभीर आहे.

मिटकरी म्हणाले केतकी चितळे ही तरुणी सुरुवातीपासून वादग्रस्त राहिली आहे. सुरुवातीच्या काळात तिने महापुरुषांवर टीका केल्या आहेत. शरद पवार यांच्याबद्दल विकृत पोस्ट तिने समाज माध्यमांवर पोस्ट केली. शरद पवार यांच्यावर टीका करताना तिने मर्यादा पाळायला पाहिजेत. तिने तसे केले नाही, म्हणून तिच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी ही मिटकरी यांनी केली. कारण हे बोलणं अत्यंत चुकीचे असून अशा वादग्रस्त विधानामुळे पाच सहा महिने चर्चेत राहून आपला टीआरपी वाढवणे याच्या पलीकडे दुसरा काही उद्देश नसावा.

शेवटी महिला म्हणून आम्ही तिचा आदर करतो. मात्र तिच्या वक्तव्याचे कुणीही समर्थन करू शकत नाही. अशा प्रकारच्या टीका करणारी ही एक विकृती आहे. ही पसरविण्याचे काम कोण करते आहे. मागच्या काळात टीका होत होत्या राजकीय टीका करण्याचा एक तो स्तर होता. मात्र तो का खालावला देवेंद्र फडणवीस जेव्हापासून विरोधी पक्षनेते झाले तेव्हापासून हा स्तर जास्तच खालावलेला दिसतोय. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मुत्सद्दी नेते यावर बोलायला तयार नसतील, तर ही गंभीर बाब असल्याचे मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT