Nagpur News, 02 Jul : महायुती सरकारने काढलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात सर्वच विरोधक एकवटले होते. ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रित मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते.
काँग्रेसनेही या मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे महायुती सरकारला आदेश मागे घ्यावा लागला. त्यानंतर दोन्ही सेनेने विजयी सभा घेण्याचे घोषित केले आहे. या सभेत कोण कोण सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आम्हाला कोणी निमंत्रण दिले नाही, मुळात भाजपने आदेश मागे घेतलाच नाही असा दावा करून त्यांनी विजयी सभा हा तर उद्धव आणि राज ठाकरे यांचा ईव्हेंट असल्याचा टोला लगावला आहे.
सध्या मनसे आणि उद्धव ठाकरे सेना यांच्या संयुक्त विजयी सभेची मुंबईत जय्यत तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या सभेत सर्वच विरोधी पक्षांनी सहाभागी व्हावे असे आवाहन केले आहे. हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही तर मराठी माणसाचा आहे असा दावा त्यांनी केला आहे. आम्ही प्रत्येकाला वैयक्तिक निमंत्रण देऊ शकत नाही.
मात्र, आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीत वादाची ठिगणी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अतुल लोंढे म्हणाले, हिंदी सक्तीचा आदेश मागे घेण्याच्या भाजपच्या आश्वासनावर आपला विश्वासच नाही. ते शक्य सुद्धा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘मुंह मे राम बगल मे नथुराम' असे त्यांचे विचार आणि धोरण आहे. नरेंद्र जाधव यांची यावर समिती नेमली आहे. या समितीला चार महिन्यात अहवाल सादर करायचा आहे. त्यावर सारे काही अवलंबून राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात राजकीय पक्षाच्या नव्हे तर मराठी मुलांच्या हितासाठी जो काही निर्णय घेऊ असे जाहीरपणे सांगितले आहे. यावरून भाजपचे इरादे दिसून येतात याकडेही लोंढे यांनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.