RajendraKumar Gavit Sarkarnama
विदर्भ

RajendraKumar Gavit News : भाजपला सोडचिठ्ठी दिलेले राजेंद्रकुमार गावित काँग्रेसचा 'हात' हाती घेणार अन् विधानसभाही लढवणार!

Mayur Ratnaparkhe

RajendraKumar Gavit and Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. इच्छुकांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. तर अनेकजण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष बदलही करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर नंदूरबारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी भाजपला(BJP) मोठा झटका मिळताना दिसत आहे. कारण, मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते आता काँगेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि विधानसभा निवडणूकही लढणार आहेत.

राजेंद्रकुमार गावित यांनी भाजपला रामराम केल्यानंतर ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करून शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस(Congress) इच्छुकाच्या मुलाखतीसाठी राजेंद्रकुमार गावित यांच्या उपस्थितीमुळे सर्वांच्याच भूवया उंचवाल्या आहेत.

तर दुसरीकडे राजेंद्रकुमार गावित काँग्रेसमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने आमदार राजेश पाडवी यांचे डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीआधी शहादा तळोदा मतदार संघात एकापाठोपाठ एक भाजपाला मोठे धक्के बसत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधूनही या ठिकाणी इच्छुकाचे मोठी संख्या दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र गावित हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देताना आगामी विधानसभेत शहादा-तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.

(Edite by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT