ajit pawar | sharad pawar| rajendra shingane.jpg sarkarnama
विदर्भ

VIDEO : "मी नाईलाजानं अजितदादांसोबत," राजेंद्र शिंगणेंनी सांगितलं 'कारण'; शरद पवारांचं केलं तोंडभरून कौतुक

Rajendra Shingane On Sharad Pawar : शरद पवारसाहेब आणि राजेंद्र शिंगणे एका कार्यक्रमाला उपस्थित असल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Akshay Sabale

Rajendra Shingane On Ajit Pawar : अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. अजितदादांसोबत काही आमदार आणि नेत्यांनी शरद पवारसाहेबांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.

पण, अजूनही काही आमदार आणि नेतेमंडळी पवारसाहेबांच्या संपर्कात आहेत. यातच शनिवारी चर्चां रंगली ती अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेले आमदार राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या विधानाची.

"मी पवारसाहेबांचं नेतृत्व मान्य करतो," असं म्हणतं शिंगणे ( Rajendra Shingane ) यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यासह "नाईलजानं अजितदादांसोबत गेलो," असं म्हणत शिंगणे यांनी कारणही सांगितलं आहे.

वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब ( Sharad Pawar ) आणि राजेंद्र शिंगणे एकत्र आले होते. शिंगणे कार्यक्रमाला उपस्थित असल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिंगणे शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेत्याच्या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम असल्यानं चर्चांना काही काळात पुर्णविराम मिळाला.

राजेंद्र शिंगणे म्हणाले, "सुरेश देशमुख यांच्या कार्यक्रमानिमित्त मी आलो होतो. शरद पवारसाहेबांसोबत वेगळ्या विषयावर चर्चा झाली. पण, राजकीय कोणतीही चर्चा झाली नाही. अजितदादांच्या गटात सामील झालो, असलो तरी मी पवारसाहेबांशी संबंध तोडले नाहीत. आजही मी पवारसाहेबांना नेता मानतो. भविष्यातही पवारसाहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे."

"मी पवासाहेबांचं नेतृत्व मान्य करतो. मी तीस वर्षांपासून पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत पवारसाहेबांचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल आयुष्यभर मी त्यांचा ऋणी राहणार आहे. पण, जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो. जिल्हा बँकेला 300 कोटी रूपये सरकारनं दिले आहेत. पण, पवारसाहेब हे माझ्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत," असं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT