Ramdas Athawale greeting Uddhav and Raj Thackeray, emphasizing Republican unity sarkarnama
विदर्भ

Ramdas Athawale on Thackeray brothers : ''ठाकरे बंधूंना शुभेच्छा, आता..'' ; आठवलेंचं सूचक विधान अन् नव्या चर्चांना उधाण!

Ramdas Athawale Extends Wishes to Thackeray Brothers : केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Rajesh Charpe

Republican unity appeal : सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा राज्यात सुरू आहेत. यावर अनेक नेत्यांनी वक्तव्य केले आहे. दोघे एकत्र आल्यास काय होणार याचे राजकीय आडाखेसुद्धा मांडले जात आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत याचे परिणाम जाणवतील असेही भाकित वर्तविले जात आहे.

यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी दोघे भाऊ एकत्र आले तरी महायुतीला कुठलाही धोका होणार नाही, असे सांगून सर्व रिपब्लिकन पक्षांनीसुद्धा एकत्र यावे असे आवाहन केले. यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही त्यांनी साद घातली.

सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही? याकडे लागले आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोन भाऊ एकत्र आल्यास ठाकरे गट बळकट होईल असाही अंदाज लावला जात आहे. यावर आठवले म्हणाले ''ते दोघे एकत्र येणार असतील तर आमच्या शुभेच्छाच आहेत. मात्र आम्ही सारे रिपब्लिकनवाले भाऊ केव्हा एकत्र येणार?'' असा सवाल त्यांनी केला.

तसेच, ''हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. रिपब्लिकन ऐक्य व्हावे ही सर्व जनतेची इच्छा आहे. हे लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांनीही ऐक्यात सामील व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या विरोधात घेतलेली भूमिक पटणारी नाही. हिंदी भाषेसोबत महाराष्ट्राची नाळ तोडणे योग्य नाही. राजकारण बाजूला ठेऊन याचा विचार करण्याची गरज आहे. मराठी भाषेसोबत हिंदी भाषा तितकीच महत्त्वाची आहे. असंही आठलेंनी सांगितलं.

याशिवाय रामदास आठवलेंनी म्हटलं की, ''केंद्र सरकाराने सुधारित केलेला वक्फ कायदा हा मुसलमान बांधवांच्या हिताचा आहे, परंतु विरोधक याचे राजकीय भांडवल करीत आहेत आणि मुस्लिम बांधवांची दिशाभूल करीत आहेत. संसदने कायदा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या चौकटी राहून निर्णय घेणे अपेक्षित आहे. शेवटी संसद हीच सुप्रीम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका या पारदर्शक झाल्या नसल्याचे वक्तव्य विदेशात केले. यावर मत व्यक्त करताना आठवले म्हणाले, राहूल गांधी यांनी विदेशात जाऊन भारतच्या विरोधात बोलू नये. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घ्यायचे नसेल तर घेऊ नये, परंतु देश बदलत असल्याची प्रशंसा करावी. असा सल्ला दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT