Ramdev Baba and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Ramdev Baba त्यांचा प्रकल्प लवकरच सुरू करतील, आंतरराष्ट्रीय विमानतळही लवकरच…

Vidarbha : मागील दहा ते बारा वर्षांपासून फारशी प्रगती होत नसल्याने वैदर्भीय नाराज आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Mihan News : विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी मिहान प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. मात्र, मागील दहा ते बारा वर्षांपासून फारशी प्रगती होत नसल्याने वैदर्भीय नाराज आहेत. सरकारने घोषित केलेल्या कंपन्यांनी उद्योग स्थापन केले नाहीत. काही कंपन्यांनी फक्त कागदोपत्री करार केले आहेत. यासंदर्भात काल विचारणा केली असता, रामदेव बाबा मिहानमध्ये पतंजलीचा प्रकल्प लवकरच सुरू करतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, मिहान प्रकल्पाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता आहे. या संदर्भातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. येत्या दोन महिन्यात निविदा काढण्यात येणार आहे आणि पतंजलीचा प्रकल्पही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे वैदर्भीयांना (Vidarbha) काळजी करण्याची कुठलीही गरज नाही. मिहानमध्ये (Mihan) पाहिजे त्या प्रमाणात प्रकल्प न आल्यामुळे ना उद्योग ना रोजगार, अशी परिस्थिती सध्या मिहानमध्ये आहे. याच प्रकल्पात रामदेव बाबा (Ramdev Baba) यांचा पतंजलीचा प्रकल्प आहे. आतापर्यंत तीन ते चार वेळा घोषणा करून प्रकल्पाला सुरुवात झालेली नाही.

सत्ताधारी आणि महाविकास आघाडी एकमेकांवर आरोप करून यास जबाबदार धरीत आहे. नागपूर विमानतळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्यासाठी यापूर्वीच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. हा वाद न्यायालयातसुद्धा गेला होता. हा वाद केव्हा निकाली लागणार आणि मिहानचा विकास केव्हा होणार, अशी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. फक्त एक छोटेसे प्रकरण बाकी राहिले आहे. त्याचा निपटारा केला जाईल आणि दोन महिन्यांच्या आत निविदा काढून विमानतळाचे काम सुरू केले जाईल, असे ते म्हणाले.

पीठगिरणीसाठी घेतली होती जागा..

पतंजलीने पिठाची गिरणी आणि फूड प्रोसेसिंगसाठी मिहानमध्ये जागा घेतली आहे. या प्रकल्पासाठी भाजपने जमीन देताना झुकते माप दिले होते, असा आरोपही होता. विदर्भातील शेतकऱ्यांचा शेतमाल रास्त भावात घेतला जाईल, तसेच रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा रामदेव बाबा यांनी केली होती. मात्र सहा वर्षांपासून हा प्रकल्प सुरूच झाला नाही. या संदर्भात फडणवीस म्हणाले, रामदेव बाबा यांच्याशी अलीकडेच चर्चा झाली. ते लवकरच प्रकल्प सुरू करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT