ललित कनोजे
Nagpur District's Ramtek APMS Election Result News : नागपूर जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीत माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांनी सर्व मतभेद विसरून रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्याशी युती केली होती. तरीही त्यांना ही बाजार समिती राखता आली नाही. (Still they could not maintain this market committee)
वर्षानुवर्षे नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारणावर दबदबा ठेवून असलेले माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांना त्यांचे जवळचेच कार्यकर्ते सोडून गेल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी सुरूवातीलच अवघड होऊन बसली होती. त्यामुळे त्यांनी स्थानिक आमदार आशिष जयस्वाल यांची मदत घेतली. पण एकेकाळी केदारांचे कट्टर समर्थक असलेल्या सचिन किरपान व मिन्नू गुप्ता या कार्यकर्त्यांनीच त्यांना पराभवाची धूळ चाखायला लावली.
किरपान व गुप्ता यांच्यासारख्या सहकार क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी सहकार पॅनेल मैदानात उतरवले. त्यामुळे आमदार केदारांना ऐनवेळी आमदार जयस्वाल यांच्याशी सर्व प्रकारचे राजकीय मतभेद विसरून युती करावी लागली. तसेच या निवडणुकीत भाजपचे नेते डी. एम. रेड्डी यांनीही उडी घेतली होती. त्यांनी या निवडणुकीत शेतकरी विकास सहकार पॅनलच्या माध्यमातून काँग्रेसचे (Congress) गज्जू ऊर्फ उदयसिंह यादव यांचेशी युती केली होती. त्यांना तरी चार जागांवर विजय मिळवता आला. पण केदार-जयस्वाल गट येथे खातेही उघडू शकले नाही.
सचिन किरपान यांनी केदारांच्या (Sunil Kedar) विरोधात शेतकरी सहकार पॅनल उभे केले होते. त्यांनी एकूण १४ जागांवर विजय मिळवला. त्यांपैकी सेवा सहकारी सोसायटीतील सर्व ११ जागा जिंकल्या. व्यापारी अडते गटातून दोन, तर हमाल मापारी गटातून एक जागा, अशा एकूण १४ जागांवर त्यांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपने (BJP) शेतकरी विकास पॅनल उभे केले होते. त्यांना ग्रामपंचायत गटातील चार जागांवर विजय मिळवता आला. आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) आणि केदारांनी लढवलेल्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.